टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आता सिडनीमध्ये दाखल झाली आहे. येथे भारतीय संघ आपला दुसरा सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. सिडनीमध्ये टीम इंडियाने आपलं पहिलं ट्रेनिंग सेशनही केले. त्यामध्ये भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने सहभाग घेतला नव्हता. सूर्यकुमार यादव त्याच्या पत्नीसह सिडनीमध्ये फिरताना दिसून आला.
सूर्यकुमार यादवने या ऑप्शनल ट्रेनिंग सेशनमधून विश्रांती घेतली होती. त्याने सोशल मीडियावर पत्नी देविशा शेट्टीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये हे दोघेही सिडनीच्या रस्त्यांवर फिरताना दिसून आले.
सूर्यकुमार यादवने २०१६ मध्ये देविशा शेट्टी हिच्याशी विवाहग केला होता. देविशा शेट्टी दक्षिण भारतीय आहे.
,सूर्यकुमार यादवच्या पत्नीचा जन्म मुंबईत झाला होता. तिने २०१३ ते २०१५ पर्यंत त्यांनी बिगर सरकारी संघटना द लाइटहाऊस प्रोजेक्टसाठी एक व्हॅलेंटियर म्हणून काम केलं होतं. ती सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असते.
देविशा शेट्टी आणि सूर्यकुमार यादव यांची भेट कॉलेजमध्ये झाली होती. लग्नाआधी या दोघांनी पाच वर्षे एकमेकांना डेट केले होते.
सूर्यकुमार यादवला पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.