T20 World Cup 2024 : तमाम भारतीयांची स्वप्नपूर्ती! हातात वर्ल्ड कप, खांद्यावर तिरंगा; टीम इंडियाचा जल्लोष, खेळाडू भावुक

T20 World Cup 2024 : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला.

हा फोटो अनेक वर्षानंतर मिळालेल्या विजयाचा आहे. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. बार्बाडोसमध्ये टीम इंडियाने मॅच जिंकली असली तरी संपूर्ण भारतात जल्लोष सुरू आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने विश्वचषक जिंकून नवा इतिहास रचला आहे.

विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा भावूक झाला. टीम इंडियाने १७ वर्षांनंतर टी-20 वर्ल्ड कप जिंकला, २००७ मध्ये भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला होता, यासोबतच टीम इंडियाने ICC ट्रॉफीचा ११ वर्षांचा दुष्काळही संपवला आहे. भारताने यापूर्वी २०१३ मध्ये आयसीसीची ट्रॉफी जिंकली होती.

विश्वचषक जिंकल्यानंतर ऋषभ पंतनेही जोरदार सेलिब्रेशन केले. अंतिम सामन्यात पंतला उत्कृष्ट खेळ दाखवता आला नाही, तो लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला.

या सामन्यानंतर विराट कोहलीने मोठी घोषणा केली. कोहली म्हणाला की, हा माझा शेवटचा T20 विश्वचषक होता आणि आम्हाला तो जिंकायचा होता. निवृत्तीची घोषणा करताना कोहली म्हणाला की, भारतासाठी हा माझा शेवटचा T20 सामना होता. मला वाटतं निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे आणि आता हा वारसा नव्या पिढीने पुढे नेण्याची वेळ आली आहे.