T20 World Cup 2024: क्रिकेटला पुन्हा ग्लॅमरचा तडका! आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकली 'महाराष्ट्राची लेक'

Tanvi Shah in T20 World Cup 2024: क्रिकेट आणि ग्लॅमर हे मिश्रण आता फॅन्सच्या सुद्धा अंगवळणी पडले आहे.

Tanvi Shah in T20 World Cup 2024: क्रिकेट जगताला ग्लॅमर चा तडका ही नवीन गोष्ट नाही. अनेक T20 क्रिकेट लीगमध्ये चिअर लीडर्स डान्स करताना दिसतात.

क्रिकेट आणि ग्लॅमर हे मिश्रण आता फॅन्सच्या सुद्धा अंगवळणी पडले आहे. चाहत्यांना ही गोष्ट आवडताना दिसत आहे.

या वर्षीच्या IPL नंतर आता ICC T20 cricket World Cup 2024 मध्येही एक तरुणी आपल्या ग्लॅमरस देहबोलीतून चाहत्यांची वाहवा मिळवताना दिसत आहे.

IPL 2023 मध्ये दिसलेली ही तरुणी म्हणजे तन्वी शाह. तन्वी ही एक स्पोर्ट्स प्रेझेंटर आणि अँकर आहे.

तन्वी क्रिकेटच्या मैदानावर दिसायला लागल्यापासून तिच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे. सध्या तिचे 264K फॉलोअर्स आहेत.

मूळची महाराष्ट्रात राहणारी तन्वी ही IPL मध्ये गुजरात टायटन्स संघाची अँकर आहे. ती फक्त गुजरात संघाच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या मुलाखती घेते.

तन्वी ही एक प्रोफेशनल टेनिस प्लेअर आहे. ती टॉप रँक ज्युनिअर टेनिस प्लेअर होती. क्रिकेटशी कनेक्शन जुळण्यापूर्वी तन्वी ने टेनिसमध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले आहे.

2000 साली ती भारताकडून टेनिस खेळली. पण तिचा कल ग्लॅमर इंडस्ट्रीकडे होता आणि तिला क्रिकेटची आवड होती , त्यामुळे ती स्पोर्ट्स अँकर बनली.

IPL मधील तिची कामगिरी पाहून आता थेट आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ICC T20 World Cup मध्ये स्पोर्ट्स अँकर म्हणून तिची वर्णी लागली आहे.