काठमांडू ते डल्लास! Nepal च्या चाहत्यांचं प्रेम पाहून सारे चकित, अमेरिकेत नाद खुळी गर्दी तर...

T20 World Cup 2024, NEP vs NED : नेपाळ क्रिकेट संघाची क्रेझ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या निमित्ताने डल्लास येथेही पाहायला मिळाली.

२०१४ नंतर नेपाळचा क्रिकेट संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे आणि इथपर्यंतच्या प्रवासात त्यांना चाहत्यांकडून भरभरून प्रेम पाहायला मिळालं आहे.

नेदरलँड्सने लढतीत नेपाळविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नेपाळला सपोर्ट करण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते डल्लास येथे उपस्थित होते.

नेपाळमध्ये मोठ्या पडद्यावर या सामन्याचे थेट प्रक्षेपण दाखवले जात होते आणि तेथेही प्रचंड गर्दी जमलेली पाहायला मिळाली. पण, नेपाळच्या फलंदाजांना साजेशी सुरुवात करता आली नाही...

सलामीवीर कुशल भुर्तेल ( ७) व आसीफ शेख ( ४) फलकावर १५ धावा असताना माघारी परतले. टीम प्रिंगले व लॉगन व्हॅन बीक यांनी हे धक्के दिले.

नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल याने आज मोठ्या विक्रमाची नोंद केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात तो सर्वात युवा कर्णधार ठरला. रोहित २१ वर्ष व २७६ दिवसांचा आहे आणि त्याने झिम्बाब्वेच्या प्रोस्पर उत्सेया ( २२ वर्ष व १७० दिवस) याचा विक्रम मोडला.

अनील शाह ( ११), कुशल मल्ला ( ९) व दिपेंद्र सिंग ऐरी ( १) यांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने नेपाळची अवस्था ५ बाद ५३ अशी झाली. रोहित संघासाठी खिंड लढवतोय.