Join us  

काय हे आयसीसी...! विजेत्या संघाला किती बक्षीस मिळणार? IPL पेक्षा काही लाखच जास्त...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 2:54 PM

Open in App
1 / 6

आयसीसी टी २० वर्ल्ड कपची आज फायनल मॅच आहे. भारत आणि आफ्रिका हे दोन संघ भिडणार आहेत. चोकर्स अशी प्रतिमा असलेले आफ्रिकन सेमीतच अनेक वर्षे गारद होत होते. हा शिक्का पुसून टाकत त्यांनी फायनलमध्ये धडक मारली आहे. आता भारत बाजी मारतो की द आफ्रिका हे पाहणे औत्स्युक्याचे आहे. या विजेत्याला आणि उपविजेत्याला किती कोटींचे बक्षीस मिळणार, याकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आता या पारितोषिकांचा आकडा आला आहे.

2 / 6

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 हा जगाचा आहे. जगभरातील संघ या स्पर्धेत खेळतात. आयसीसीने आतापर्यंतच्या स्पर्धांपेक्षा जास्त प्राईज मनी ठेवला आहे. असे असले तरी आपल्या आयपीएलपेक्षा काही लाखच जास्त आहे. बीसीसीआयने ठरविले तर पुढच्या वर्षी आयसीसी वर्ल्डकपच्या बक्षीसापेक्षा जास्त बक्षीस ठेवू शकते.

3 / 6

आयसीसीने एकूण प्राईज मनी 11.25 मिलियन यूएस डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांत 93.51 कोटी रुपये ठेवले आहे. यामध्ये विजेता, उपविजेता, सेमीमध्ये हरलेले आणि या स्पर्धेत खेळलेल्या संघांच्या मानधनाचाही समावेश आहे.

4 / 6

या टी २० वर्ल्डकपमध्ये संघांवर पैशांची बरसात होणार आहे. भारत किंवा दक्षिण आफ्रिका यापैकी जो संघ जिंकेल त्याला 2.45 मिलियन यूएस डॉलर म्हणजे भारतीय रुपयांत 20.36 कोटी रुपये मिळणार आहेत.

5 / 6

तुम्हाला माहितीय का, आयपीएलच्या विजेत्याला किती पैसे मिळतात... आयपीएल जिंकणाऱ्या संघाला बीसीसीआय २० कोटी रुपये देते. वर्ल्डकपमध्ये रनरअप संघाला 1.28 मिलियन यूएस डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांत 10.64 कोटी रुपये मिळणार आहेत.

6 / 6

सेमीमध्ये पोहचणाऱ्या संघांना 787,500 यूएस डॉलर म्हणजेच 6.54 कोटी रुपये मिळणार आहेत. सुपर ८ पर्यंत पोहोचलेल्या संघांना 3.17 कोटी रुपये मिळणार आहेत. तर ९ ते १२ व्या स्थानी असलेल्या संघांना 2.05 कोटी रुपये मिळणार आहे. इतरही संघांना पैसे मिळणार आहेत. या संघांना 1.87 कोटी रुपये अदा केले जाणार आहेत.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाआयपीएल २०२४बीसीसीआयरोहित शर्मा