Join us  

T20 World Cup 2024 Super 8 Scenario : दक्षिण आफ्रिकेचे Super 8 मधील स्थान पक्के; जाणून घ्या पाकिस्तानसह अन्य गटांमध्ये कोणाला बसणार धक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 4:22 PM

Open in App
1 / 6

ड गटाचा विचार केल्यास नेदरलँड्स व बांगलादेश हे संघ प्रत्येकी २ गुणांसह अजूनही सुपर ८ च्या शर्यतीत आहेत. बांगलादेशला उर्वरित २ सामन्यांत नेदरलँड्स ( १३ जून) व नेपाळ ( १७ जून) यांचा सामना करायचा आहे, तर नेदरलँड्सला बांगलादेश व श्रीलंका ( १७ जून) यांच्याशी मुकाबला करायचा आहे. दोन्ही संघांपैकी जो संघ दोन्ही लढती जिंकेल तो सुपर ८ मध्ये पात्र ठरेल. त्यामुळे बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स हा एकप्रकारे नॉक आऊट सामना आहे. दोघांनी १-१ सामना जिंकल्यास आणि श्रीलंकेने उर्वरित दोन ( वि. नेपाळ व वि. नेदरलँड्स) सामने जिंकल्यास नेट रन रेट निर्णायक ठरेल.

2 / 6

क गटात अफगाणिस्तान व वेस्ट इंडिज यांनी विजयी घोडदौड कायम राखली आहे आणि दोन विजयासह त्यांनी प्रत्येकी ४ गुण कमावले आहेत. अफगाणिस्तानला उर्वरित दोन लढतींमध्ये पापुआ न्यू गिनी ( १४ जून) व वेस्ट इंडिज ( १८ जून) यांचा सामना करायचा आहे, तर विंडीजसमोर न्यूझीलंड ( १३ जून) व अफगाणिस्तानचे आव्हान आहे. याही गटात वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना नॉक आऊट असेल. तेच त्याचवेळी न्यूझीलंडने उर्वरित ३ सामने मोठ्या फरकाने जिंकल्यास नेट रन रेटच्या जोरावर ते क गटातून दुसरे स्थान पटकावून आगेकूच करू शकतील.

3 / 6

ब गटात स्कॉटलंडने ३ सामन्यांत २ विजय मिळवून ५ गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. इंग्लंडविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता आणि दोन्ही संघांना १-१ गुण मिळाले होते. इंग्लंडचे २ सामन्यांत फक्त १ गुण झाले आहेत. याच गटात ऑस्ट्रेलियात २ सामन्यांत ४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. स्कॉटलंडचा शेवटचा साखळी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे आणि त्यांनी हा सामना जिंकला तर त्यांचे सुपर ८ मधील स्थान पक्के होईल. पण, या सामन्यात हार झाली तरी त्यांना नेट रन रेट ( सध्या २.१६४) कसा चांगला ठेवता येईल हे पाहायला हवे.

4 / 6

इंग्लंडचा नेट रन रेट हा -१.८०० असा आहे आणि उर्वरित दोन सामन्यांत त्यांना ओमान व नामिबिया यांचा मुकाबला करावा लागेल. हे सामने त्यांना मोठ्या फरकाने जिंकावे लागतील तेव्हा ते ५ गुणांसह स्कॉटलंडची बरोबरी करूनही नेट रन रेटच्या जोरावर सुपर ८ मध्ये पोहोचतील. अन्यथा त्यांचे आव्हान इथेच संपेल. ऑस्ट्रेलियाला दोनपैकी १ विजय पुरेसा आहे.

5 / 6

अ गटात भारत आणि अमेरिका हे प्रत्येकी ४ गुणांसह आघाडीवर आहेत. अमेरिकेला उर्वरित सामन्यांत भारत ( १२ जून ) व आयर्लंड ( १४ जून) यांचा सामना करायचा आहे आणि यापैकी एक विजय पुरेसा आहे. तेच भारतासमोर अमेरिका व कॅनडा ( १५ जून ) यांचे आव्हान आहे.

6 / 6

कॅनडाही या शर्यतीत आहे आणि आज पाकिस्तानविरुद्ध त्यांनी विजय मिळवल्यास हा गट चुरशीचा बनू शकतो. पाकिस्तान व आयर्लंड यांना उर्वरित दोन सामने जिंकून स्पर्धेत राहता येईल, परंतु त्यांना इतरांचा पराभव व नेट रन रेट या गोष्टींची मदत लागेल.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024द. आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघपाकिस्तानश्रीलंका