Cricket Buzz»फोटो गॅलरी »'विक्रम'वीर झाम्पा! ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूनं इतिहास रचला; असं करणारा पहिला खेळाडू ठरला'विक्रम'वीर झाम्पा! ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूनं इतिहास रचला; असं करणारा पहिला खेळाडू ठरला By ओमकार संकपाळ | Published: June 12, 2024 11:40 AMOpen in App1 / 9ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ॲडम झाम्पाने बुधवारी ऐतिहासिक कामगिरी केली. नामिबियाविरूद्ध चार बळी घेऊन त्याने आपल्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. 2 / 9नामिबियाला नमवून ऑस्ट्रेलियाने सुपर ८ चे तिकीट मिळवले. खरे तर ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० बळी घेणारा झाम्पा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. 3 / 9३२ वर्षीय फिरकीपटू ॲडम झाम्पाने झेन ग्रीन, डेव्हिड विसे, रूबेन ट्रम्पलमॅन आणि बर्नार्ड शोल्टज यांना बाहेरचा रस्ता दाखवला.4 / 9ऑस्ट्रेलियन स्टार झाम्पाने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अर्थात ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १०० बळी घेण्याची किमया साधली. त्याने ८३ सामन्यांमध्ये ७.२० च्या सरासरीने गोलंदाजी करताना १०० बळी पूर्ण केले.5 / 9प्रथम गोलंदाजीत मग फलंदाजीत दबदबा दाखवत ऑस्ट्रेलियाने नामिबियाविरूद्ध मोठा विजय मिळवला. या विजयासह कांगारूंनी सुपर ८ मध्ये प्रवेश केला. 6 / 9ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये विजयाची हॅटट्रिक ऑस्ट्रेलियाला सहा गुण देऊन गेली. त्यांच्यापाठोपाठ ब गटात ५ गुणांसह स्कॉटलंड दुसऱ्या स्थानी आहे. 7 / 9बुधवारी झालेल्या सामन्यात नामिबियाने दिलेल्या ७३ धावांच्या आव्हानाचा सहज पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला. विश्वचषकातील २४ वा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवला गेला. 8 / 9७३ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी स्फोटक खेळी केली. अवघ्या ५.४ षटकांत १ बाद ७४ धावा करून कांगारूंनी मोठा विजय साकारला. 9 / 9डेव्हिड वॉर्नर २० धावा करून बाद झाला. तर ट्रॅव्हिस हेड (नाबाद ३४ धावा) आणि कर्णधार मिचेल मार्शने नाबाद १८ धावा करून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सुपर ८ चे तिकीट निश्चित केले. आणखी वाचा Subscribe to Notifications