Join us  

T20 World Cup Final : वर्ल्ड कप फायनल ना रविवारी, ना सोमवारी होणार; जेतेपद विभागून दिले जाणार? ICC ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 11:35 AM

Open in App
1 / 9

T20 World Cup Final : पाकिस्तानने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक दिली आणि आज दुसरा स्पर्धक ठरणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यात एडिलेड येथे दुसरी उपांत्य फेरीची लढत होतेय. या लढतीतील विजेता रविवारी १३ नोव्हेंबरला मेलबर्नवर पाकिस्तानविरुद्ध जेतेपदाचा सामना खेळणार आहे. पण, या लढतीबाबत महत्त्वाचे अपडेट्स समोर येत आहेत.

2 / 9

पाकिस्तानने काल सिडनी येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडवर ७ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. न्यूझीलंडच्या १५२ धावांचा पाठलाग करताना बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांनी शतकी भागीदारी करून विजयाचा पाया रचला आणि अन्य फलंदाजांनी त्यावर कळस चढवला.

3 / 9

बाबर ४२ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ५३ धावांवर, तर रिझवान ४३ चेंडूंत ५७ धावांवर माघारी परतला. मोक्याच्या क्षणी किवींनी ही महत्त्वाची विकेट मिळवली. मोहम्मद हॅरिसने चौकार-षटकार खेचून पाकिस्तानवरील सर्व दडपण दोन चेंडूंत हलके केले. २ धावा हव्या असताना हॅरीस ( ३० ) बाद झाला. पण, पाकिस्तानने ७ विकेट्स राखून विजय पक्का केला.

4 / 9

भारत-इंग्लंड यांच्यात एडिलेडवर सामना होणार आहे आणि येथे काल पावसाने मुसळधार बॅटिंग केली आणि त्यामुळे आज लढतीवर प्रश्नचिन्ह आहे. पण, आताचा तेथील हवामानाचा अंदाज पाहता सध्यातरी तेथे ढगाळ वातावरण नाही. गारवा जाणवतोय. तेथील किमान तापमान १७ डिग्री सेल्सिअस आहे आणि कमाल तापमान २६ डिग्री सेल्सिअस आहे.

5 / 9

सकाळी पावसाच्या हलक्या सरी येऊन गेल्या. दुपारी पावसाचा अंदाज नाहीच आहे. ऑस्ट्रेलियातील वेळेनुसार IND vs ENG सामना सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. त्यामुळे संध्याकाळचा हवामानाचा अंदाज पावसाची शक्यता २० टक्के असल्याचा वर्तवत आहे.

6 / 9

त्यातच फायनलबाबत मोठी अपडेट्स समोर आले आहेत. मेलबर्न येथे रविवारी व सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मेलबर्नच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार सामन्याच्या वेळेस पाऊस पडण्याची शक्यता ९५ टक्के इतकी आहे. रविवार व सोमवार हे दोन्ही दिवस पावसामुळे वाया जाण्याचा सध्यातरी अंदाज आहे.

7 / 9

ICC च्या नियमानुसार उपांत्य फेरी व फायनलसाठी राखीव दिवस ठेवला गेला आहे. आयसीसीच्या नियमानुसार आता किमान १० षटकांचा सामना होणे आवश्यक आहे, तरच DLS नियमाचा अवलंब होईल. या दोन दिवसांत एकही चेंडू फेकला गेला नाही, तर फायलनमध्ये पोहोचलेल्या दोन्ही संघांना संयुक्त विजेता जाहीर केले जाईल.

8 / 9

9 / 9

आयसीसीने पावसाचा अंदाज लक्षात घेता सामन्यासाठी ३ तासापेक्षा अधिक कालावधीची परवानगी दिली आहे, परंतु हवामानाच्या अंदाजानुसार ही लढत होणे शक्य नाही, असेच सध्यातरी दिसतेय

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानभारत विरुद्ध इंग्लंडपाऊसआयसीसी
Open in App