T20 World Cup India Vs Afghanistan : कोहलीसारख्या फिटनेसची गरज नाही, त्याच्यापेक्षा लांब षटकार मारू शकतो : शहजाद

T20 World Cup India Vs Afghanistan Shahzad on Virat Kohli: पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांना फिरकिपटूंचा सामना करण्यास अपयश आल्याचं दिसून आलं होतं. त्यातच अफगाणिस्तानही आपल्या फिरकीपटूंच्या मदतीनं भारताला टक्कर देण्याची शक्यता आहे.

T20 World Cup India Vs Afghanistan Shahzad on Virat Kohli : T20 विश्वचषकात पाकिस्तान (Pakistan) आणि न्यूझीलंडकडून (NewZealand) पराभव झाल्यानंतर सेमी फायनलमध्ये प्रवेशाच्या भारताच्या आशा जवळपास मावळल्या आहेत.

याशिवाय दुसरीकडे पाहिलं तर अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याचा निकालही भारतासाठी महत्त्वपूर्ण आहे. भारत आज अफगाणिस्तानचा सामना करणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध भारतीय फलंदाजांना फिरकीपटूंचा सामना करण्यास समस्या निर्माण झाल्या होत्या. तर दुसरीकडे अफगाणिस्तानकडेही तीन फिरकीपटू आहेत.

संयुक्त अरब अमिरातीमधील क्रिकेट पिचेस ही फिरकीपटूंसाठी महत्त्वाची ठरतआहेत. अशातच अफगाणिस्तानही भारताला जोरदार टक्कर देईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शेहजादचं एक वक्तव्य खुप व्हायर होत आहे.

९० किलो वजन असलेल्या मोहम्मद शहजाद याला अनेकदा फिटनेसवरून टीकेला सामोरं जावं लागलं होतं. परंतु त्यानं याकडे लक्ष देण्याचं टाळलं आहे. त्यानं आपल्या मजेशीर स्वभावासाठी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला.

यावेळी त्यानं आपल्या फिटनेसवरही वक्तव्य केलं. "आम्ही फिटनेसही पूर्ण ठेवतो आणि खातोही पूर्ण," असं शेहजाद यावेळी म्हणाला.

पाकिस्तानी रेफ्युजी कॅपसाठी खेळलेल्या शेहजादनं म्हटलं की प्रत्येकजण विराट कोहलीप्रमाणे फिट असू शकत नाही. कोहली जितका लांब फटकार लगावू शकतो त्यापेक्षा लांब मी मारू शकतो. त्याच्या इतकं डाएट करण्याची गरज काय आहे, असं तो यावेळी म्हणाला.

"माझे कोच फिल सिमन्स यांना कल्पना आहे की मी ५० षटकं यष्टीरक्षण करतो आणि ५० षटकं फलंदाजीही करतो. माझं वजन कधीही माझ्या क्रिकेटच्या मध्ये आलं नाही," असं शहजाद म्हणाला.

आकडेवरीवरूनही टी२० सामन्यांमध्ये अफगाणिस्तानसाठई सर्वाधिक धावा त्यानंच केल्याचंही सिद्ध होत आहे. याशिवाय एकदिवसीय सामन्यांमध्ये तो धावांबाबत मोहम्मद नबीच्या मागे आहे.

यापूर्वी त्याला अनेकदा समस्यांचा सामना करावा लागला होता. त्याच्यावर एका वर्षासाठी डोपिंग बॅनही घालण्यात आलं होतं.

याशिवाय झिम्बाब्वे विरुद्ध झालेल्या सामन्यात तो बाद झाल्यानंतर इतका नाराज झाला होता की त्यानं ग्राऊंडला नुकसान पोहोचवलं होतं. त्यानंतर त्याच्यावर दोन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती.

आपल्या वादाबद्दल तो म्हणाला, चूक ही माणसांकडूनच होत असते. आता मी तुमच्यासोबत कॉफी पित आहे, काय माहित मी यानंतर डोपिंग टेस्टमध्ये फेल होईन.

त्यानं आपल्या कुटुंबाबद्दलही वक्तव्य केलं. आपलं कुटुंब अतिशय मोठं असल्याचं तो म्हणाला. तसंच मोजता मोजता रात्र होईल. माझी दोन मुलं आहे. सहा भाऊ-बहिणी आहेत आणि माझी आई आहे. जेव्हा क्रिकेटमधून थोडा वेळ मिळतो तेव्हा मी माझ्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवणं पसंत करतो, असंही त्यानं नमूद केलं.