Join us  

T20 World Cup: विराट कोहली व खेळाडू यांच्यातले ड्रेसिंग रुममधील वाद हाताळण्यासाठी महेंद्रसिंग धोनीची निवड?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 4:48 PM

Open in App
1 / 9

भारतीय क्रिकेट संघात सर्व काही सुरळीत नाही, हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. कर्णधार विराट कोहली आणि संघातील अन्य खेळाडू यांच्यात वाद असल्याचे हळुहळू समोर येत आहे. रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. हे सर्व वाद बीसीसीआयला आधीच माहीत होते आणि म्हणूनच ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी संघ निवडताना त्यांनी महेंद्रसिंग धोनी ( T20 World Cup, MS Dhoni Mentoring Role) याची मेंटॉर म्हणून नियुक्ती केली. पण, बीसीसीआयनं हे पाऊल का उचललं, याचं नेमकं कारण समोर आलं आहे.

2 / 9

InsideSport.co ला बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, संघाला मार्गदर्शन करणे, एवढीच जबाबदारी महेंद्रसिंग धोनीवर नसणार आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे, त्याला टीममधील खेळाडूंना एकसंघ ठेवायचे आहे. ड्रेसिंग रुममध्ये वाद आहेत आणि त्यामुळे बीसीसीआय चिंतीत आहे. त्याचा परिणाम ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत संघाच्या कामगिरीवर होण्याची भीती बीसीसीआयला वाटते.

3 / 9

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नंतर विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये आला आणि त्यानं चेतेश्वर पुजारा व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. याबाबत अजिंक्यने बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे तक्रार केल्याचे वृत्त IANSनं प्रसिद्ध केले होते.

4 / 9

या घटनेच्या एका महिन्यानंतर विराट कोहली कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाला. बीसीसीआयनं हे वृत्त फेटाळून लावले, परंतु आठवड्यातच विराटनं ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद वर्ल्ड कप स्पर्धेनंतर सोडणार असल्याचे जाहीर केले.

5 / 9

दरम्यान बीसीसीआयनं माजी कर्णधार महेंद्रसिंग सिंग धोनीची मेंटॉर म्हणून निवड केली. खेळाडूंमधली वाढलेली दरी कमी करण्यासाठी आणि ड्रेसिंग रुममधील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी धोनीची निवड केली गेली आहे. कोहलीसह टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील प्रत्येक खेळाडू धोनीचा आदर करतो.

6 / 9

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०१० व २०१६ चा आशिया कप, २०११चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. त्याचे विक्रम अविश्वसनीय आहेत. त्यामुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत तो मेंटॉर म्हणून संघासोबत असणे खूप चांगली गोष्ट आहे, असे बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

7 / 9

''त्याचं संघात एक वेगळंच मानाचं स्थान आहे आणि सर्व त्याचा आदर करतात. त्याला मेंटॉर म्हणून नेमणे म्हणजे कोणाला कमी लेखणे, असं होत नाही. सर्वांनीही अविश्वसनीय कामगिरी केली आहे,''असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्याचवेळी त्यांनी बोर्डानं विराटला कर्णधारपद सोड असं विचारलंही नाही. तो सर्वस्वी त्याचाच निर्णय आहे. आम्ही त्याला पायऊतार होण्यास का सांगू?, तो चांगली कामगिरी करतोय.''

8 / 9

विराट कोहली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्यात अपयशी ठरला, तर भविष्यात वन डे संघासह कसोटीचेही कर्णधारपद सोडू शकतो.

9 / 9

टॅग्स :विराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१बीसीसीआय
Open in App