T20 World Cup, PAK vs SA : टीम इंडिया Semi Final मध्ये कोणाला भिडणार? पाकिस्तान-द. आफ्रिका सामन्यानंतर कसं असेल समीकरण?

Semifinal Scenario, T20 World Cup, PAK vs SA : पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका आजच्या सामन्यानंतर भारताला Semi Final मध्ये कुणाशी भिडावे लागेल हे निश्चित होईल किंवा तसा अंदाज स्पष्ट होईल.

पाकिस्तानने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आजच्या सामन्या दक्षिण आफ्रिकेला आश्चर्याचा धक्का दिला. ४ फलंदाज ४३ धावांवर माघारी परतल्यानंतरही शादाब खान व इफ्तिखार अहमद यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांना बेक्कार धुतले आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.

पाकिस्तानने ४ बाद ४३ वरून ९ बाद १८५ धावांचा डोंगर उभा केला आणि प्रत्युत्तरात आफ्रिकेने २ बाद ३९ धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यानंतर भारताला Semi Final मध्ये कुणाशी भिडावे लागेल हे निश्चित होईल किंवा तसा अंदाज स्पष्ट होईल.

दक्षिण आफ्रिकेने आज पाकिस्तानवर विजय मिळवल्यास ग्रुप २ मधून उपांत्य फेरीत त्यांचे स्थान पक्के होईल. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ मध्ये उपांत्य फेरीत स्थान पक्के करणारा तो पहिला संघ ठरेल. ग्रुप २ मधून आफ्रिका अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत स्थान पक्के करेल.

दक्षिण आफ्रिकेचा अखेरचा सामना नेदरलँड्सविरुद्ध आहे आणि तो जिंकून त्यांचे ९ गुण होतील. ते अव्वल स्थानी जातील. या परिस्थितीत भारताचा अखेरचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. तो जिंकून भारत ८ गुणांसह ग्रुप २ मधून दुसऱ्या क्रमांकावरून उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ग्रुप १ मधील अव्वल संघ ग्रुप २ मधील दुसऱ्या क्रमांकावरील संघाशी खेळले. यानुसार ग्रुप १ मध्ये न्यूझीलंड टॉपर आहे आणि भारत-न्यूझीलंड ( India vs New Zealand) असा सामना होण्याची शक्यता अधिक आहे.

दक्षिण आफ्रिका आज हरल्यास ते अखेरच्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवून ७ गुणांसह उपांत्य फेरीत जाईल. भारत अखेरची लढत जिंकून ८ गुणांसह टेबल टॉपर होईल. अशा परिस्थितीत ग्रुप १ मधून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी एकाशी होईल.

ग्रुप १ मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया प्रत्येकी ५ गुणांसह शर्यतीत आहेत.