T20 World Cup SA vs NED: टीम इंडिया सेमी फायनलमध्ये! नेदरलँडने ग्रुप २ मधील समीकरणच बदलले; पाकच्या आशा पल्लवित

आज अॅडलेडमध्ये जबरदस्त सामना पहायला मिळाला. चोकर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या द. आफ्रिकेने दुबळ्या नेदरलँडसोबत कच खाल्ली आणि १३ धावांनी सामना गमावला.

ऑस्ट्रेलियातील टी २० वर्ल्डकपमध्ये आज दोन मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजाला बलात्काराच्या आरोपाखाली सिडनी पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आलेले असताना नेदरलँडने द. आफ्रिकेचा धुव्वा उडवला आहे. यामुळे टीम इंडिया आरामात सेमी फायनलमध्ये पोहोचली असून पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या आशादेखील पल्लवित झाल्या आहेत.

आज अॅडलेडमध्ये जबरदस्त सामना पहायला मिळाला. चोकर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या द. आफ्रिकेने दुबळ्या नेदरलँडसोबत कच खाल्ली आणि १३ धावांनी सामना गमावला. या धक्कादायक निकालामुळे भारत थेट सेमीमध्ये पोहोचला आहे. सेमीसाठी क्वालिफाय करणारा भारत तिसरा संघ ठरला आहे. आता ग्रुप २ मधून सेमीमध्ये कोण जाणार याचा निर्णय काही वेळातच पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्याच्या निकालानंतर ठरणार आहे.

पाकिस्तान- बांग्लादेशमध्ये जो कोणी जिंकेल तो संघ सेमीमध्ये जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर ग्रुप २ चे पूर्ण समीकरणच बदलले आहे. भारतीय संघाचा शेवटचा गट सामना आज झिम्बाब्वे विरुद्ध होणार आहे. भारतीय संघ हा सामना हरला तरी तो उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल, कारण टीम इंडिया सध्या 6 गुणांसह आपल्या ग्रुप-2 मध्ये अव्वल स्थानावर आहे. तर आफ्रिका संघ ५ गुणांसह बाद झाला आहे.

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातदेखील थोड्या वेळात सामना सुरु होणार आहे. अॅडलेडमध्ये हा सामना होणार आहे. हे दोन्ही संघ आता ४-४ गुणांनी बरोबरीत आहेत. जो संघ जिंकेल त्याला २ गुण मिळणार आहेत. म्हणजेच द. आफ्रिकेपेक्षा एक गुण जास्त होणार आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या ग्रुप १ मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. इंग्लंडने ४ विकेट्सने श्रीलंकेवर विजय मिळवला आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे पॅकअप झाले. ग्रुप १मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्या प्रत्येकाच्या खात्यात ७ गुण आहेत. पण, नेट रन रेटच्या जोरावर न्यूझीलंडने ग्रुप १ मध्ये अव्वल व इंग्लंडने दुसरे स्थान पटकावत उपांत्य फेरीत प्रवेश केला. न्यूझीलंडचा नेट रन रेट हा +२.११३ इतका आहे, तर इंग्लंडचा +०.४७३ इतका आहे. ऑस्ट्रेलियाचा -०.१७३ असा नेट रन रेट आहे.

भारत-इंग्लंड सेमी फायनल झाल्यात ती १० नोव्हेंबरला एडिलेडवर दुपारी १.३० वाजल्यापासून सुरू होईल. न्यूझीलंड- आफ्रिका उपांत्य फेरीची लढत ९ नोव्हेंबरला सिडनीवर होईल. न्यूझीलंड विरुद्ध पाक-बांग्लादेशमध्ये जो जिंकेल तो आणि भारत विरुद्ध इंग्लंड अशा सेमी फायनलच्या लढती होतील.