Join us  

T20 World Cup : न्यूझीलंडच्या खेळाडूचं मोठं वक्तव्य; "ग्रुप स्टेजमध्ये IPL मुळे मिळाली मोठी मदत"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 3:14 PM

Open in App
1 / 9

T20 World Cup New Zealand : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India Vs New Zealand) सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा पराभव केला होता. यानंतर भारताची सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची वाट खडतर झाली आहे. भारताचं सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.

2 / 9

याचदरम्यान, न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज टीम साऊदी यांनं इंडियन प्रीमिअर लीग (IPL) बाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. टी २० विश्वचषकापूर्वी IPL मध्ये भाग घेतल्यामुळे मोठा फायदा झाला असल्याचं वक्तव्य त्यानं केलं आहे.

3 / 9

ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, अॅडम मिल्ने, काईल जेमिसन, मिशेल सेंटनरसारख्या गोलंदाजांनी गेल्या महिन्यात पार पडलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात सहभाग घेतला होता.

4 / 9

'या विश्वचषकात भाग घेणाऱ्या अनेक संघांचे खेळाडू आयपीएलचा भाग होते. यामुळे निश्चित सर्वांना गोलंदाज म्हणून परिस्थिती समजून घेण्याची संधी मिळाली. टी २० विश्वचषकापूर्वी याच पिचवर खेळणं हे मदतीचं ठरलं,' असं टीम साऊदी म्हणाला.

5 / 9

'जेव्हा तुम्ही ICC च्या कोणत्याही स्पर्धेत भाग घेता, तेव्हा तयारी बदलत नाही. तुम्ही फार पुढचं सांगू शकत नाही. आम्ही पाकिस्तानविरोधात झालेल्या पराभवातून धडा घेतला आमि चुकांवरुन शिकलो. त्याचा फायदा आम्हाला भारताविरोधातील सामन्यात झाला,' असंही त्यानं स्पष्ट केलं.

6 / 9

हा आठवडा हा व्यस्त असणार आहे. एका मजबूत भारतीय टीमला हरवण्यासाठी आमच्या टीमचे उत्तम प्रयत्न होते, असंही त्यानं नमूद केलं.

7 / 9

३२ वर्षीय टीम साऊदी हा या विश्वचषकात उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. त्यानं यापूर्वी झालेल्या सामन्यात चांगल्या इकॉनॉमी रेटनं दोन विकेट घेतल्या. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी टीम साऊदी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमचा भाग होता.

8 / 9

आयसीसी स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धचे पराभवाचे चक्र टीम इंडियाला भेदता आलं नव्हतं. भारतीय फलंदाजांनी लाजीरवाणी कामगिरी केल्यानं न्यूझीलंड सहज पार करू शकेल इतकी धावसंख्या उभारली गेली होती.

9 / 9

भारताचे फलंदाज या सामन्यात कागदी 'वाघ' ठरले. या सामन्यातील सकारात्मक बाब म्हणजे टीम इंडियाला विकेट घेता आल्या आणि हार्दिक पांड्यानं गोलंदाजी केली. आता टीम इंडियाला अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे. केननं खिंड लढवताना न्यूझीलंडचा सहज विजय मिळवून दिला होता. न्यूझीलंडनं तो सामना ८ विकेट्सनं जिंकला होता.

टॅग्स :आयपीएल २०२१ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१न्यूझीलंड
Open in App