Cricket Buzz»फोटो गॅलरी »सौंदर्य अन् फिटनेसमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींवरही भारी पडतेय 'ही' टीम इंडियाची खेळाडू!सौंदर्य अन् फिटनेसमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींवरही भारी पडतेय 'ही' टीम इंडियाची खेळाडू! By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 5:33 PMOpen in App1 / 12भारतीय महिला क्रिकेट संघानं या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 2 / 12यजमान ऑस्ट्रेलियाकडून त्यांना हार पत्करावी लागली असली तरी भारतीय संघाच्या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केलं.3 / 12या कामगिरीनं भारतीय संघातील खेळाडूंना स्टार बनवलं. याच संघातील यष्टिरक्षक - फलंदाज तानिया भाटियानं सर्वांचे लक्ष वेधले आहे.4 / 12मैदानावरील कामगिरीच्या जोरावर तिनं जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षकांमध्ये स्थान पटकावलं आहे. पण, खेळाबरोबरच तिच्या सौंदर्याची आणि फिटनेसनं सर्वांना चकित केलं आहे. 5 / 1228 नोव्हेंबर 1997मध्ये चंडीगढ येथे जन्मलेल्या तानियानं कमी वयातच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 6 / 122018मध्ये तिनं वयाच्या 22व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तानियाचे वडील संजय भाटिया यांनी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्तरावर क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. 7 / 12शालेय स्तरावर तिला भारताचा फलंदाज युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग यांनी प्रशिक्षण दिले.8 / 12तानियानं वयाच्या 11व्या वर्षीच पंजाबच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं आणि ती सर्वात युवा खेळाडू होती.9 / 12क्रिकेटसोबतच तिचं प्राण्यांवरही विशेष प्रेम आहे. 13व्या वर्षी तिनं आंतरराज्य स्थानिक स्पर्धेत पंजाबच्या वरिष्ठ संघात स्थान पटकावले. अशी कामगिरी करणारी ती सर्वात युवा खेळाडू होती. 10 / 122015च्या आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेत तिनं उत्तर विभागाच्या संघाचे नेतृत्व सांभाळले होते. तियनं 227 धावा करताना 10 बळी टिपले. 11 / 1212 / 12 आणखी वाचा Subscribe to Notifications