प्रसिद्धीपासून दूर राहतात रोहित शर्माचे कुटुंबीय! पाहा आई-वडील व लहान भावाचे Unseen Photo

Rohit Sharma Family Album भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज भलेही एवढ्या मोठ्या पदावर पोहोचला असेल, पण त्याचे कुटुंबीय अजूनही प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करतात. रोहित शर्माचे वडील गुरुनाथ शर्मा, आई पूर्णिमा शर्मा आणि भाऊ विशाल शर्मा यांचे कधी न पाहिलेले फोटो आज आपण पाहणार आहोत.

रोहित शर्माचे जगभरात करोडो चाहते आहेत. रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरा देखील अनेकदा चर्चेत राहतात. पण रोहितचे आई-वडील आणि लहान भाऊ विशाल या सगळ्या प्रसिद्धीपासून दूर राहतात.

रोहित शर्माचा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी नागपुरात झाला. रोहित शर्माचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या पुरेसे सक्षम नव्हते. रोहितचे वडील गुरुनाथ शर्मा एका ट्रान्सपोर्ट फर्ममध्ये केअरटेकर म्हणून काम करायचे आणि त्यांचा पगार खूपच कमी होता. अशा परिस्थितीत रोहित शर्माला वाढवणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते.

रोहित शर्मा लहानपणी मुंबईतील बोरिवली येथे आजी-आजोबा आणि काका-काकूंसोबत राहत होता. डोंबिवलीत एका खोलीच्या घरात राहणारा रोहित शर्मा सुट्टीत आई-वडिलांना भेटायला जायचा.

रोहित शर्माची आई पौर्णिमा विशाखापट्टणम येथील आहे आणि त्यामुळे रोहितला थोडीफार तेलुगू भाषा येते.

रोहितला एक लहान भाऊ विशालही आहे. विशालचे लग्न झाले आहे. रोहित शर्माने त्याच्या इंस्टाग्रामवर विशालच्या लग्नाचा फोटोही शेअर केला होता.

विशाल शर्मा याचे लग्न दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार झाले आहे. भावाच्या लग्नात रोहित आणि रितिका केळीच्या पानांवर पारंपारिक पदार्थ खातानाचे फोटो व्हायरल झाले होते.

विशाल हुबेहुब रोहितसारखा दिसतो. रोहित शर्माचे आई-वडील आणि लहान भाऊ प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करतात.