Join us  

Sunil Gavaskar Team India WTC Final 2025: "या खेळाडूला कसोटी संघात घ्या, टीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशीप नक्की जिंकेल"; सुनील गावसकरांचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 5:04 PM

Open in App
1 / 7

भारतीय संघाने कॅरेबियन बेटांवर झालेल्या टी२० वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावले. तब्बल १७ वर्षांनी भारतीय संघाला टी२० विश्वचषक पुन्हा एकदा जिंकता आला.

2 / 7

ICCच्या निरनिराळ्या स्पर्धांबाबत बोलायचे झाल्यास, २०१३ नंतर टीम इंडिया अनेक वेळा फायनलमध्ये पोहोचली पण भारताच्या पदरी सातत्याने निराशाच आली.

3 / 7

विश्व कसोटी अजिंक्यपद म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप WTC 2023 मध्येही भारत फायनलमध्ये पोहोचला पण तेथे ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाची धूळ चारली.

4 / 7

आता WTCची पुढची फायनल २०२५ मध्ये रंगणार आहे. टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्य राहता येईल असे मत माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.

5 / 7

कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाला बलाढ्य व्हायचे असेल तर त्यासाठी सुनील गावसकरांनी एका स्टार क्रिकेटपटूचे नाव सुचवले आहे.

6 / 7

'टीम इंडियाने पुढील दोन महिन्यात हार्दिक पांड्याला टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी राजी करायला हवे. त्याने दिवसातून १० षटकं टाकली आणि बॅटिंग केली तर भारतीय संघ अजिंक्य आणि बलाढ्य होईल' असे गावसकर म्हणाले.

7 / 7

'हार्दिक पांड्याला संघात घेतले तर भारतीय संघ आगामी काळातील कसोटी विश्वचषकाची फायनल तर जिंकेलच पण ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्या भूमीवर हरवण्यातही यशस्वी होईल,' असा विश्वासही गावसकरांनी व्यक्त केला.

टॅग्स :सुनील गावसकरहार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया