Join us  

Rohit, Virat की Dhoni... सर्वोत्तम कर्णधार कोण? Ashwin ने दिलं रोखठोक उत्तर, कारणही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 2:39 PM

Open in App
1 / 7

R Ashwin, Best Captain: महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) मैदानात शांत राहून टीम इंडियाला अनेक विजय मिळवून दिले. विराट कोहलीने (Virat Kohli) आक्रमकपणे नेतृत्व करत संघाला विजय मिळवून दिले. तर रोहित शर्माने (Rohit Sharma) मैदानात धमाल-मस्ती करत संघाला सामने जिंकायला शिकवले.

2 / 7

तीनही कर्णधारांनी आपल्या कारकीर्दीत भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेले. या तिघांनीही एका खेळाडूवर कायम विश्वास दाखवला. तो म्हणजे रवीचंद्रन अश्विन. अश्विनने तिघांच्याही नेतृत्वात चांगली कामगिरी केली.

3 / 7

अशा स्थितीत महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा या तिघांमध्ये सर्वोत्तम कर्णधार कोण? याची कायमच चर्चा असते. हाच प्रश्न अश्विनला देखील विचारण्यात आला. त्यावर अश्विन काय म्हणाला, वाचा...

4 / 7

अश्विन एका मुलाखतीत म्हणाला, 'रोहितच्या कर्णधारपदाबद्दल २-३ गोष्टी चांगल्या आहेत. तो संघातील वातावरण नेहमी खेळकर ठेवतो. ड्रेसिंगरुममध्ये कायमच हलकेफुलके विनोद सुरु असतात.'

5 / 7

'रोहित अतिशय संतुलित आणि रणनीतीच्या दृष्टीने मजबूत आहे. धोनी-विराट हे देखील स्ट्रॅटेजिकली मजबूत होते. पण रोहित तंत्रज्ञानाचा अधिक वापर करुन रणनीतीबाबत अधिक काम करतो.''

6 / 7

'कोणत्याही मोठ्या सामन्याच्या आधी किंवा मालिकेपूर्वी रोहित भारतीय क्रिकेट संघाच्या अनालेटिकल टीमसोबत बसून नीट रणनीती आखतो. कोणताही मोठा सामना किंवा मालिका असेल तर रोहित संघातील सपोर्ट स्टाफ, अनालेटिक्स आणि प्रशिक्षकांसोबत बसून आगामी सामन्याची योग्य तयारी करतो.'

7 / 7

'एखाद्या विशिष्ट फलंदाजात काय चुका आहेत, गोलंदाजीबाबत काय योजना असायला हव्यात, याचे कागदावरील प्लॅनिंग रोहितकडे तयार असते. ही रोहितची ताकद आहे. तसेच एखाद्याला प्लेइंग-११ मध्ये निवडले असेल तर १००% सपोर्ट करतो,' ही बाबदेखील अश्विनने अधोरेखित केली.

टॅग्स :आर अश्विनरोहित शर्माविराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघ