Join us  

टीम इंडिया 2020तील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रवाना, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 8:59 AM

Open in App
1 / 10

घरच्या मैदानावर श्रीलंका ( ट्वेंटी-20) आणि ऑस्ट्रेलिया ( वन डे ) यांना पराभवाची चव चाखवल्यानंतर टीम इंडिया 2020 मधील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रवाना झाली आहे.

2 / 10

भारतीय संघानं नववर्षातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यांत श्रीलंकेवर 2-0 असा, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत 2-1 असा विजय मिळवला.

3 / 10

भारतीय खेळपट्टींवर वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया आणखी तगड्या आव्हानाचा सामना करण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना झाली आहे.

4 / 10

न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडिया पाच ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

5 / 10

ट्वेंटी-20 मालिकेतून रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी टीम इंडियात पुनरागमन करणार आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी रोहितने विश्रांती घेतली होती.

6 / 10

भारताचा संघ - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर.

7 / 10

न्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), हामिश बेन्नेट, टॉम ब्रूस ( 4-5 सामन्यासाठी), कॉलिन डी ग्रँडहोम ( पहिल्या तीन सामन्यांसाठी), मार्टिन गुप्तील, स्कॉट कुग्गेलेन, डॅरील मिचेल, कॉलीन मुन्रो, रॉस टेलर, ब्लेअर टिकनर, मिचेल सँटनर, टीम सेईफर्ट ( यष्टिरक्षक), इश सोढी, टीम साऊदी.

8 / 10

ट्वेंटी-20 सामन्यांचे वेळापत्रक - 24 जानेवारी, दुपारी 12.30 वा., 26 जानेवारी, दुपारी 12.30 वा., 29 जानेवारी, दुपारी 12.30 वा., 31 जानेवारी, दुपारी 12.30 वा., 2 फेब्रुवारी, दुपारी 12.30 वा.

9 / 10

वन डे सामन्यांचे वेळापत्रक - 5 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा., 8 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा., 11 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.

10 / 10

कसोटी सामन्यांचे वेळापत्रक - 21 ते 25 फेब्रुवारी, पहाटे 4 वा. आणि 29 फेब्रुवारी ते 4 मार्च, पहाटे 4 वा.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघरोहित शर्मामोहम्मद शामीरिषभ पंतजसप्रित बुमराह