Cricket Buzz»फोटो गॅलरी »MS Dhoni Farmhouse: ३ वर्षांत तयार झालं धोनीच ७ एकरातील फार्महाऊस, पाहा Inside PhotosMS Dhoni Farmhouse: ३ वर्षांत तयार झालं धोनीच ७ एकरातील फार्महाऊस, पाहा Inside Photos By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 2:46 PMOpen in App1 / 8टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन दोन वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी त्याची लोकप्रियता तशीच आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला तीन वेळा आयसीसीचे जेतेपद पटकावण्यात यश आले. यासोबतच धोनीने आपल्या टीम सीएसकेला आयपीएलमध्ये चार वेळा चॅम्पियन बनवले आहे.2 / 8एमएस धोनीचे स्वतःचे फार्म हाऊस देखील आहे, ज्याची अनेकदा चर्चा होते. रांचीच्या रिंगरोडजवळ असलेले हे फार्म हाऊस सुमारे तीन वर्षांत पूर्ण झाले. रिपोर्टनुसार, हे फार्महाऊस माहीने स्वतः डिझाईन केले असून यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत.3 / 8एमएस धोनीचे हे फार्महाऊस ईजा फार्म म्हणून ओळखले जाते. धोनीच्या फार्महाऊसमध्ये टरबूज, पेरू, पपई आणि स्ट्रॉबेरीसारख्या विविध प्रकारची फळे आणि भाज्यांची लागवडही केली जाते.4 / 8धोनीच्या फार्महाऊसमध्ये एक मोठी जिम, स्विमिंग पूल, सरावासाठी पार्क आणि इनडोअर सुविधाही आहेत. फार्महाऊसचा बहुतांश भाग लँडस्केप लॉन आणि विविध प्रकारच्या झाडांनी व्यापलेला आहे.5 / 8फार्महाऊसमध्ये एक मोठी लिविंग रुमही आहे. एमएस धोनीची पत्नी साक्षी अनेकदा सोशल मीडियावर फार्म हाऊसचे फोटो शेअर करत असते.6 / 8एमएस धोनीला कार आणि बाइक्सची अतिशय आवड आहे. अशा परिस्थितीत एमएस धोनीच्या फार्म हाऊसमध्ये कार आणि बाइक ठेवण्यासाठी मोठे गॅरेज आहे.7 / 8धोनीच्या फार्म हाऊसमध्ये चेतक व्यतिरिक्त शेटलँड पोनी जातीचा घोडा देखील आहे. शेटलँड पोनी जातीचा पांढरा घोडा धोनीने स्कॉटलंडहून आणला होता. हा घोडा जगातील सर्वात लहान दिसणाऱ्या घोड्यांपैकी एक आहे.8 / 8महेंद्रसिंग धोनीचे आवडते पाळीव प्राणीही फार्म हाऊसच्या लॉनमध्ये दिसत आहेत. धोनी अनेकवेळा आपल्या पाळीव श्वानांसोबत खेळताना दिसला आहे. एमएस धोनीच्या या फार्म हाऊसवर अनेक भारतीय क्रिकेटर्सनंही भेट दिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications