Join us  

Virat Kohli : कोहलीचा 'हा' विक्रम पाहून रवी शास्त्रींना बसला होता धक्का, आता केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 12:54 PM

Open in App
1 / 6

Virat Kohli : इंग्लंड दौऱ्यावर रिशेड्युल्ड कसोटी सामन्यादरम्यान विराट कोहलीची समोर आलेली आकडेवारी पाहून आपण आश्चर्यचकित झालो होतो, असा खुलासा नुकताच भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला. या आकडेवारीबाबत रवी शास्त्रींनी कोहलीची केन विल्यमसन, डेव्हिड वॉर्नर, बाबर आझम आणि जो रूट या स्टार खेळाडूंशीही तुलना केली.

2 / 6

आशिया चषक 2022 चे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शास्त्री म्हणाले, 'इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान, एक आकडेवारी समोर आली ज्यामुळे मला खरोखरच आश्चर्य वाटले. आकडेवारीनुसार, विराट कोहली तीन वर्षांत जगातील अव्वल खेळाडू केन विल्यमसन, डेव्हिड वॉर्नर, बाबर आझम आणि जो रूट यांच्या तुलनेत सर्व फॉरमॅटमध्ये पट मॅच खेळला आहे.”

3 / 6

मला आश्चर्य वाटले की तो सुमारे ९५० सामने खेळला होता, त्यानंतर पुढील खेळाडू ४०० सामने खेळला होता. त्यांनी निम्म्याहून कमी सामने खेळले होते. जेव्हा तुम्ही संघाचे कर्णधार असता, तिन्ही फॉरमॅट खेळता तेव्हा ते खूप जास्त असते असंही शास्त्री म्हणाले.

4 / 6

रवी शास्त्री यांनी कोहलीला अतिशय जवळून पाहिलं आहे आणि त्याला संघात प्रशिक्षणही दिलं आहे. तो लवकरच आपल्या फॉर्ममध्ये परतेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फिटनेसच्याबाबतीत कोहलीपेक्षा वरचढ असा कोणताही भारतीय खेळाडू नाही असंही त्यांनी सांगितलं.

5 / 6

कोहली इतका मोठा खेळाडू आहे, त्याच्याकडे फिटनेस आहे, शारीरिक ताकद आहे. मानसिक ताकदीने तो आपली कामगिरी पुन्हा चांगली करू शकतो. त्याचा जोश हा पूर्वीप्रमाणेच आहे आणि हे मी अतिशय विश्वासानं सांगू शकतो, असं शास्त्री यांनी नमूद केलं.

6 / 6

त्याच्यात जोश आहे आणि तो ज्या परिस्थितीतून जात आहे त्यातून त्यानं नक्कीच एक शिकवण घेतली असेल. सर्वच खेळाडू शिकतात. जेव्हा तुम्ही तुमच्या कारकिर्दीच्या शिखरावर असता आणि सर्वकाही अचानक थांबतं आणि तुम्ही पुन्हा खाली येता, तेव्हा तुमचा विश्वास तुम्हाला पुन्हा त्यातून बाहेर येण्यास आणि परिस्थितीचा सामना करण्यास प्रेरण देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :रवी शास्त्रीविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ
Open in App