Hardik Pandya : बेन स्टोक्स प्रमाणे हार्दिक पांड्याही पुढील वर्षी वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो; रवी शास्त्रींचा सूचक इशारा

हार्दिक पांड्याने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्ससाठी IPL 2022 चे विजेतेपद पटकावले. आयपीएलमधील जबरदस्त कामगिरीमुळेच हार्दिकने भारतीय संघात पुनरागमन केले.

अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकल्याचे अनेक खेळाडूंना वाटत आहे.

अधिक क्रिकेटमुळे खेळाडूंना तिन्ही फॉरमॅट खेळणे कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात इतर खेळाडूही बेन स्टोक्सचा मार्ग अवलंबू शकतात.

दरम्यान, भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शास्त्री म्हणाले की, टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पुढील वर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषकानंतर वनडेतून निवृत्ती घेऊ शकतो.

रवी शास्त्रींच्या मते, २८ वर्षीय हार्दिक पांड्या टी-20 क्रिकेटवर आपले लक्ष केंद्रित करू शकतो. केवळ पांड्याच नाही तर इतर अनेक खेळाडू देखील ज्यास पात्र आहेत असे त्यांचे आवडता फॉर्मेट निवडण्यास सुरवात करतील, असेही त्यांनी नमूद केले.

कसोटी क्रिकेट हा कायमच महत्त्वाचा भाग राहील. खेळाडूंना जे खेळायचं आहे तो फॉर्मेट आधीपासूनच निवडू लागले आहेत. हार्दिक पांड्याबाबत सांगायचं झालं तर त्याला टी २० खेळायचं आहे. त्याच्या मनात ही गोष्ट स्पष्ट आहे आणि त्याला आणखी कोणताही फॉर्मेट खेळायचा नाही, असेही त्यांनी सांगितले.

पुढील वर्षी विश्वचषक सामने असल्यामुळे तो ५० षटकांचा सामने खेळेल. अन्य खेळाडूही असेच निर्णय घेऊ शकतात. ते फॉर्मेट निवडण्यास सुरूवात करतील आणि यावर त्यांचा अधिकार आहे, असेही शात्री यांनी स्पष्ट केले.

फ्रेन्चायझी क्रिकेटचं भविष्यात वर्चस्व असेल. क्रिकेटचे रिझल्ट पाहिले पाहिजे. खेळाडूंना जागतिक देशांतर्गत क्रिकेट खाण्यापासून कोणी रोखत नाही. जोवर जगभरातील बोर्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट कमी करण्याचा निर्णय घेत नाही, तोवर क्रिकेटर्स काही फॉर्मेटमधून निवृत्ती घेणे सुरू ठेवतील, असेही त्यांनी सांगितलं.

फ्रेन्चायझी क्रिकेट जगभरावर अधिराज्य गाजवणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसं होईल. त्यांना त्यात कपात करावी लागेल. द्विपक्षीय क्रिकेट कमी करावे लागेल आणि त्याच दिशेनं जावं लागेल. खेळाडूंना निरनिराळ्या फ्रेन्चायझीकडे खेळपासून रोखू शकत नसल्याचेही शास्त्री म्हणाले.