T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos

t20 world cup 2024 : यूएईच्या धरतीवर तीन ऑक्टोबरपासून महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघासमोरचे पुढील मोठे आव्हान म्हणजे ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४. यूएईत होणाऱ्या या स्पर्धेसाठी टीम इंडिया रवाना झाली आहे.

यूएईच्या धरतीवर तीन ऑक्टोबरपासून महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.

आपल्या पुरुष संघाप्रमाणे आपणही विश्वचषकाची ट्रॉफी जिंकावी यासाठी भारताचा संघ मैदानात असेल.

भारत पुन्हा एकदा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात असेल, तर स्मृती मानधनावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बीसीसीआयने खेळाडूंसह सपोर्ट स्टाफची एक झलक शेअर केली आहे. यामध्ये हरमनप्रीत, स्मृतीसह श्रेयांका पाटील आदी खेळाडू पाहायला मिळत आहेत.

BCCI ने जाहीर केलेल्या भारताच्या १५ खेळाडूंच्या संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. अलीकडेच ICC ने T20 World Cup 2024 चे नवीन वेळापत्रक जारी केले.

ही स्पर्धा तीन ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. महिला विश्वचषक 2024 चे यजमानपद बांगलादेशकडे होते. पण तेथे राजकीय हिंसाचार उफाळून आल्यामुळे आयसीसीने ठिकाण बदलले.

२० ऑगस्टला आयसीसीने या स्पर्धेसाठी नवे ठिकाण जाहीर करत स्पर्धा यूएईमध्ये होईल असे सांगितले. भारतीय संघ ४ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून आपल्या अभियानाची सुरुवात करेल.

दरम्यान, टीम इंडिया ६ तारखेला पाकिस्तानविरुद्ध, ९ तारखेला श्रीलंकेविरुद्ध आणि १३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात असेल.

हरमनप्रीत कौर (कर्णधार) स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकूर, हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील, एस संजीव.