द्विदेशीय मालिका कमी करा अन् फुटबॉलमधील प्रयोग वापरा
द्विदेशीय ट्वेंटी-२० मालिका कमी व्हायला हव्यात. फुटबॉलमध्ये प्रीमिअर लीग, स्पॅनिश लीग, इटालियन लीग आणि जर्मन लीग आहेत. या सर्व लीगमधील क्लब चॅम्पियन्स लीगमध्ये एकत्र खेळतात. त्यामुळे फार कमीच द्विदेशीय फुटबॉल मैत्रीपूर्ण सामने होतात. राष्ट्रीय संघ फक्त वर्ल्ड कप किंवा वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत खेळतात आणि युरोपियन चॅम्पियनशीप, कोपा अमेरिका आणि दी आफ्रिका कप मध्ये खेळतात. याच मार्गानं ट्वेंटी-२० क्रिकेटनं पुढे जायला हवं, असे शास्त्री म्हणाले.