Join us  

Team India ODI Squad: संजू सॅमसन OUT, जयदेव उनाडकट IN… BCCI ने वन डे वर्ल्ड कपआधी दिले 'हे' 3 मोठे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 11:43 AM

Open in App
1 / 6

India ODI Squad vs Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. BCCI ने आपल्या वन डे मालिकेसाठी निवडलेल्या संघाद्वारे या वर्षी होणाऱ्या ODI World Cup 2023 बद्दल तीन मोठे संकेत दिले आहेत. या तिन्ही निर्णयांमुळे चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

2 / 6

भारतीय संघ सध्या रोटेशन पॉलिसी म्हणजे काही नव्या खेळाडूंना संधी देण्याच्या दृष्टीने संघात सातत्याने बदल करत आहे. त्यामुळेच गेल्या अनेक मालिकांमध्ये टी२०, कसोटी आणि वन डे असा तीनही मालिकांसाठी भारताचा पूर्णपणे वेगळा संघ पाहायला मिळाला आहे. पण असे असले तरी वर्ल्ड कपच्या दृष्टीने विचार करता, BCCI च्या प्लॅनचे काही अंदाज बांधता येऊ शकतात.

3 / 6

Sanju Samson ला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतून वगळण्याचा अर्थ असा आहे की, बीसीसीआयने त्याला या वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपच्या प्लॅनमध्ये ठेवलेले नाही. संजूने गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये एकूण 10 एकदिवसीय सामने खेळले आणि 71 च्या सरासरीने 284 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेटही 100 च्या जवळपास आहे.

4 / 6

KL Rahul सध्या अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे, तरीही त्याची BCCI ने संजू सॅमसन ऐवजी संघात निवड केली आहे. संजू सॅमसन IPL मधील राजस्थान रॉयल्स संघाची कमान सांभाळत आहे. या वर्षाच्या शेवटी वन डे वर्ल्ड कप भारतातच होणार आहे, असे असताना सॅमसनऐवजी राहुलला संधी दिली जात असल्याचे चित्र आहे.

5 / 6

डावखुरा वेगवान गोलंदाज Jaydev Unadkat ची २०१३ नंतर प्रथमच वनडे संघात निवड झाली आहे. याचा अर्थ असा घेता येईल की बीसीसीआय डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून उनाडकटकडे पाहत असून तो एकदिवसीय विश्वचषकात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. तर दुसरीकडे अर्शदीप मात्र बीसीसीआयच्या वर्ल्ड कप योजनेचा भाग नसल्याचे दिसत आहे.

6 / 6

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासंजू सॅमसनलोकेश राहुलअर्शदीप सिंगरोहित शर्मा
Open in App