Join us  

PHOTOS : कुलदीपची धार्मिक वारी! अलीकडेच लग्नाबद्दल विधान अन् आता धीरेंद्र शास्त्रींचं घेतलं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 5:27 PM

Open in App
1 / 10

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू कुलदीप यादवने बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री यांचे दर्शन घेतले. याची झलक बागेशश्वर धाम या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.

2 / 10

२९ जून रोजी रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ जिंकण्याची किमया साधली. सांघिक खेळीच्या जोरावर टीम इंडियाने अपराजित राहून जग जिंकले.

3 / 10

अलीकडेच कुलदीपने त्याच्या लग्नाबद्दल भाष्य केले होते.

4 / 10

मी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कोणती बॉलिवूड अभिनेत्री नाही पण लवकरच लग्नाची चांगली बातमी मिळेल, असे कुलदीप यादवने सांगितले होते.

5 / 10

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर कुलदीप यादवने बागेश्वर धाम येथे जाऊन धीरेंद्र शास्त्री यांचे आशीर्वाद घेतले.

6 / 10

कुलदीपने संपूर्ण कुटुंबासह बाबा बागेश्वर धाम गाठले आणि धीरेंद्र शास्त्रींचे आशीर्वाद घेतले. त्याच्याशिवाय इतरही क्रिकेटपटू इथे हजेरी लावत असतात.

7 / 10

कुलदीपने धीरेंद्र शास्त्रींचे आशीर्वाद घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. विश्वचषकापूर्वीही त्याने धीरेंद्र शास्त्रींचे आशीर्वाद घेतले होते.

8 / 10

कुलदीप यादव भारताच्या राष्ट्रीय संघातून बाहेर असतानाही त्याने बाबा बागेश्वर धामला हजेरी लावली होती. ट्वेंटी-२० विश्वचषकात साजेशी कामगिरी करण्यात त्याला यश आले.

9 / 10

२/३२ विरूद्ध अफगाणिस्तान, ३/१९ विरूद्ध बांगलादेश, २/२४ विरूद्ध ऑस्ट्रेलिया, ३/१९ विरूद्ध इंग्लंड आणि ०/४५ विरूद्ध दक्षिण आफ्रिका.

10 / 10

टॅग्स :कुलदीप यादवभारतीय क्रिकेट संघऑफ द फिल्डबागेश्वर धाम