जोडी नंबर वन! सॅमसनचा 'इम्पॅक्ट प्लेअर', पत्नी चारुलताच्या वाढदिवशी संजूची लक्षवेधी पोस्ट

संजू सॅमसनची पत्नी चारुलता सॅमसन शनिवारी तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक खेळाडू संजू सॅमसनची पत्नी चारुलता सॅमसन शनिवारी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. पत्नीच्या या खास दिवशी संजूने हटक्या अंदाजात एक पोस्ट केली.

पत्नी चारुलताला इम्पॅक्ट प्लेअर असे म्हणत त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अलीकडेच सॅमसनने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अवघ्या ४० चेंडूत शतक झळकावले होते.

त्याने या शतकासह टीकाकारांना प्रत्युत्तर देताना विक्रमाला गवसणी घातली. त्या सामन्यात भारताने तब्बल २९७ धावांपर्यंत मजल मारली होती. संजूसह कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी फिनिशिंग टच दिला होता.

दरम्यान, सॅमसनने त्याची कॉलेजमधील मैत्रीण चारुलता हिच्यासोबत विवाह केला आहे. मात्र या दोघांच्या लव्हस्टोरीबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे.

चारुलता केरळमधील तिरुवनंतपुरम येथील रहिवासी आहे. चारुलता कॉलेजमध्ये संजू सॅमसनची क्लासमेट होती. संजू आणि चारुलता यांनी तिरुवनंतपुरममधील कॉलेजमधून एकत्र शिक्षण घेतले होते.

संजू सॅमसनने फेसबूकवर चारुलताला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. तेव्हापासूनच त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली होती.

त्यानंतर त्यांनी आपली इच्छा कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी दोघांचे धुमधडाक्यात लग्न लावून दिले. ५ वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २२ डिसेंबर २०१८ रोजी दोघांनी लग्न केले.

संजू सॅमसनची पत्नी सौंदर्याच्या बाबतीत कुठल्याही अभिनेत्रीला टक्कर देईल अशी आहे. तिने शालेय शिक्षण तिरुवनंतपुरममधूनच पूर्ण केले.

तर, चारुलताने मार इवानियोस कॉलेजमधून रसायन विज्ञान विषयाची पदवी घेतली होती. संजूने याच कॉलेजमधून बीएची पदवी मिळवली होती.