देविशा शेट्टीने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ज्या दिवसापासून मी तुला भेटले, त्या दिवसापासून तू माझे जीवन असे बदलून टाकले की ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. आपण सवयींच्या बाबतीत इतके समान बनत आहोत की, दोघांनाही समान गोष्टी आवडतात. तुला जो खाद्यपदार्थ आवडतो तोच मलाही भुरळ घालतो. एक गोष्ट एकाचवेळी बोलणे... हे अवास्तव आहे. मी सांगूही शकत नाही तेवढे तुझ्यावर प्रेम आहे. तू जे काही आहेस त्याबद्दल धन्यवाद. मी अधिक विचारू शकत नाही.