टीम इंडियाचा विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्मा याने आज प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत प्रेक्षकांमध्ये हजेरी लावली.
अवघ्या १५ दिवसांपूर्वी भारतीय संघाला टी२० विश्वचषक जिंकवूण देणारा कर्णधार रोहित शर्मा 'जेंटलमन' पोशाुखात म्हणजेच सूट-बुट घालून विम्बल्डनचा सामना पाहायला पोहोचला.
यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत क्रिकेट जगतातील अनेक आजी-माजी खेळाडूंनी हजेरी लावली आहे. त्यातच आता रोहित शर्माचाही समावेश झाला.
रोहित शर्माने आयुष्यात पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धेसाठी हजेरी लावली. यावेळी तो अत्यंत स्टायलिश लूक मध्ये होता आणि प्रचंड हँडसम दिसत होता.
रोहित शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या या खास फोटोंनी मुंबईच्या हिटमॅनचा रॉयल कारभार दिसून आला. चाहत्यांनाही त्याला हा लूक भलताच आवडला.