राहुल द्रविड- ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खराब कामगिरी केल्यानंतर राहुल द्रविडने 2012 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते. टीम इंडियाचे असे दोनच फलंदाज आहेत, ज्यांनी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,000 हून अधिक धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त, द्रविडने कसोटीत 13,288 धावा केल्या आहेत. यात 36 शतके आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे. द्रविडने वनडेमध्ये 10,889 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याच्या 12 शतकांचा समावेश आहे. क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेण्याचा विश्वविक्रम द्रविडच्या नावावर आहे. त्याने 301 डावात 210 झेल घेतल्या. क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या द्रविडने कोचिंगमध्येही मोठे नाव कमवले, पण त्याला निरोपाच्या सामन्याचा मान मिळाला नाही.