Team India: टीम इंडियातील हे ६ खेळाडू पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये खेळणार, पाहा कोण कोण आहेत ते?

Team India For World Cup 2023 : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा समजल्या जाणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघातील सहा खेळाडून पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणार आहेत. या खेळाडूंनी आतापर्यंत आपल्या कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.

क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा समजल्या जाणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघातील सहा खेळाडून पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणार आहेत. या खेळाडूंनी आतापर्यंत आपल्या कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.

या खेळाडूंमध्ये पहिलं नाव आहे ते शुभमन गिलचं. २३ वर्षीय शुभमन गिलने गेल्या वर्षभरात दमदार कामगिरी केलेली आहे. त्यामुळे शिखर धवनसारख्या दिग्गज खेळाडू ऐवजी त्याला सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळालं आहे. आता विश्वचषक स्पर्धेतही त्याच्याकडून जबरदस्त कामगिरीची अपेक्षा असले.

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन हा सुद्धा पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळणार आहे. इशान किशनने त्याला मिळालेल्या मर्यादित संधींचं सोनं केलं आहे. तसेच आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर निवड समितीचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. भारताच्या फलंदाजी क्रमामध्ये उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्यांचा भरणा आहे, अशा परिस्थितीत इशान किशनच्या समावेशामुळे फलंदाजी क्रमामध्ये वैविध्य येईल.

टी-२० मध्ये स्फोटक खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवचीही विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. २०२१ मध्ये वयाच्या ३० व्या वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवने टी-२० मध्ये ४६.०२ च्या सरासरीने १८४१ धावा कुटल्या आहेत. मात्र एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही.

भारताचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज श्रेयस अय्यर हासुद्धा पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळणार आहे. श्रेयसने चौथ्या क्रमांकावर खेळताना सातत्यपूर्ण फलंदाजी केलेली आहे.

भारताच्या वेगवान गोलंदाजीचं हत्यार असलेला मोहम्मद सिराज हा पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. मोहम्मद सिराजने आपल्या वनडे कारकिर्दीमध्ये भेदक गोलंदाजी करताना आतापर्यंत ३० सामन्यात २०.००४ च्या सरासरीने ५४ विकेट्स टिपले आहेत.

या यादीमधील सहावा खेळाडू आहे शार्दुल ठाकूर. शार्दुल हासुद्दा पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. शार्दुल अष्टपैलू खेळाडू असून, गरजेच्या वेळी तो उपयुक्त फलंदाजी करू शकतो.