PHOTOS : Team India च्या खेळाडूची नवी इनिंग; गर्लफ्रेंडला बनवलं आयुष्याचा जोडीदार

Deepak Hooda Marriage : भारतीय संघाचा खेळाडू विवाहबंधनात अडकला.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू दीपक हुड्डा विवाहबंधनात अडकला आहे. त्याने त्याच्या प्रेयसीसोबत सातफेरे घेतले. शुक्रवारी हुड्डाने त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली.

दीपक हुड्डाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्याने एक भारी कॅप्शन लिहिले, ज्याने क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधले.

दीपकने लिहिले की, अखेर नऊ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक संवाद आम्हाला या सुंदर दिवसाकडे घेऊन आला आहे.

तसेच हिमाचलच्या माझ्या छोट्या मुलीचे घरी स्वागत आहे. कुटुंब आणि मित्रांनी नटलेला हा मांडव... सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही नवीन सुरुवात करत आहे. आमचे मन भरले आहे, सर्वांचे आभार, अशा शब्दांत दीपकने उपस्थितांचे आभार मानले.

दीपक शेवटच्या वेळी आयपीएल २०२४ मध्ये दिसला होता. लखनौ सुपर जायंट्ससाठी खेळताना त्याने काही खास कामगिरी केली नाही. धावांसाठी संघर्ष करत असलेल्या दीपकसाठी आयपीएल २०२४ चा हंगाम म्हणजे एक वाईट स्वप्नच.

दीपकने आयपीएलच्या सोळाव्या हंगामात ११ सामन्यात १३८.१० च्या स्ट्राईक रेटने केवळ १४५ धावा केल्या. त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही.

खरे तर दीपक हुड्डाने भारतीय संघाकडून १० वन डे आणि २१ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. त्याने वन डेमध्ये १५३ तर ट्वेंटी-२० मध्ये ३६८ धावा केल्या आहेत.

दीपकने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक शतक झळकावले असून, अष्टपैलू कामगिरी करताना ९ बळी देखील घेतले आहेत.

त्याने मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये शेवटचा ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.