भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचा जगभरात चाहता वर्ग आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे फॉलोअर्सही तितके असणे हे साहजिकच आहे.
क्रीडा विश्वात गेल्या काही वर्षांपासून विराटने गाजवलेले वर्चस्व आपण सर्व पाहत आलो आहोच. त्यामुळे सर्वात महागड्या खेळाडूंमध्येही कोहलीचे नाव टॉप टेनमध्ये असणे ओघाने आलेच.
सोशल मीडियावर त्याच्या प्रत्येक पोस्टवर नेटिझन्स तुटून पडतात आणि त्यातून त्याला बक्कळ पैसाही मिळतो.
ट्विटरवरील त्याच्या एका पोस्टला मिळणारी रक्कम ऐकून तुम्हाला आश्चर्यच वाटेल.
विराटच्या ट्विटरवरील एका पोस्टची किंमत ही 2.5 कोटी रुपये आहे.
तरीही ट्विटरवर एका पोस्टसाठी सर्वाधिक रक्कम घेणाऱ्या खेळाडूंमध्ये कोहली पाचव्या स्थानावर आहे.
ट्विटरवर एका पोस्टसाठी सर्वाधिक रक्कम घेणाऱ्या खेळाडूंमध्ये फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो 6.5 कोटींसह अव्वल स्थानावर आहे.
त्यानंतर बार्सिलोना क्लबचा फुटबॉलपटू आंद्रे इनिएस्ता ( 4.2 कोटी), ब्राझीलचा स्टार नेयमार ( 3.4 कोटी) आणि बास्केटबॉलपटू लेब्रोन जेम्स ( 3.3 कोटी) यांचा क्रमांक येतो.
नुकताच कोहलीनं सोशल मीडिया इस्टाग्रामवर एक विक्रम नावावर केला. इंस्टाग्रामवर 50 मिलियन फॉलोअर्स असलेला तो पहिला भारतीय ठरला.
ब्रँड व्हॅल्यूतही कोहलीनं सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थान पटकावले आहे. 2019च्या तुलनेत त्याची ब्रँड व्हॅल्यू 39 टक्क्यांनी वाढून 237.5 मिलियन डॉलर इतकी झाली आहे.
इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल स्थानी आहे. त्याचे 200 मिलियन फॉलोअर्स आहेत.