Join us  

IPL की वर्ल्ड कप? आयपीएल २०२३ ची तारीख ठरली, पण टीम इंडियावर ओढावतेय कसोटी वर्ल्ड कप गमावण्याची वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 12:31 PM

Open in App
1 / 6

सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये भारताला आणखी सहा सामने खेळायचे आहेत. बांगलादेश दौऱ्यावर दोन कसोटी सामने होतील, त्यानंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामने खेळायला भारत दौऱ्यावर येईल. सध्या, भारत ५२.०८ टक्केवारीसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका ५३.३३ च्या विजयाच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे.

2 / 6

Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलचे १६वे पर्व ३१ मार्च किंवा १ एप्रिल २०२३ पासून सुरू होणार आहे. गतविजेता गुजरात टायटन्सच्या लढतीने अहमदाबाद येथून आयपीएल २०२३ची सुरूवात होईल. आयपीएल २०२३ ची फायनल २८ मे किंवा ४ जून २०२३ ला होण्याचा अंदाज आहे.

3 / 6

त्याचवेळी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल ७ ते ११ जूनला होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आयसीसीच्या नियमानुसार दोन स्पर्धांमध्या किमान ७ दिवसांचे अंतर असायला हवे. अशा परिस्थिती जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळण्याच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या टीम इंडियाची कोंडी झाली आहे.

4 / 6

याचा अर्थ आयपीएल २०२३ आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा यांच्या तारखांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता अधिक आहे. इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने आयपीएल फायनलसाठी २८ मे किंवा ४ जून या तारखा निश्चित केल्या आहेत. या दोन्ही तारखा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी टीम इंडियाला मारक ठरू शकतात.

5 / 6

सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये भारताला आणखी सहा सामने खेळायचे आहेत. बांगलादेश दौऱ्यावर दोन कसोटी सामने होतील, त्यानंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामने खेळायला भारत दौऱ्यावर येईल. सध्या, भारत ५२.०८ टक्केवारीसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका ५३.३३ च्या विजयाच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे.

6 / 6

पाकिस्तानच्या पराभवानंतर भारताला आता बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करायचा आहे. त्याचवेळी, भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर एकच कसोटी जिंकावी लागणार आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध व्हाईटवॉश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित कसोटीत विजय मिळवला, तर त्यांचाही अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो.

टॅग्स :आयपीएल २०२२जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाबीसीसीआय
Open in App