या तीन फिरकीपटूंनी मुख्य नेटमध्ये फलंदाजांना गोलंदाजी दिली नाही, उलट त्यांनी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांच्या देखरेखीखाली 'स्पॉट' गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. पूर्वी क्रिकेटमध्ये गोलंदाज अशाप्रकारे सराव करायचे, पण सध्या असा सराव ट्रेंडमध्ये नाही.