Join us  

Gautam Adani Vs Mukesh Ambani : आशियातील सर्वात श्रीमंत गौतम अदानी ट्वेंटी-२० संघ खरेदी करणार; मुकेश अंबानी, शाहरुखच्या संघांना टक्कर देणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 3:05 PM

Open in App
1 / 6

Gautam Adani Vs Mukesh Ambani : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी अदानी ग्रुपने अहमदाबाद व लखानौ फ्रँचायझीसाठी प्रत्येकी ५१०० कोटींची बोली लावली होती, परंतु तरीही त्यांना यापैकी एकही फ्रँचायझी खरेदी करता आली नाही. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्त असलेल्या गौतम अदानी ( Gautam Adani) यांनी IPL फ्रँचायझी विकत न घेण्याची उणीव भरून काढली आहे.

2 / 6

संजीव गोएंका यांच्या RPSG Group आणि CVC Capital यांनी विक्रमी किमतीत अनुक्रमे लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी नावावर केली, तर CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली. अहमदाबाद फ्रँचायझी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स या नावाने, तर लखनौ फ्रँचायझी लखनौ सुपर जायंट्स या नावाने मैदानावर उतरणार आहेत.

3 / 6

आयपीएल फ्रँचायझी खरेदी करण्यात अपयशी ठरलेल्या अदानी ग्रुपने मोठी खेळी केली आहे आणि आता ते मुकेश अंबानी व शाहरुख खान यांच्या संघांना टक्कर देण्यासाठी मैदानावर उतरणार आहेत. Cricbuzz ने दिलेल्या माहितीनुसार अदानी समुहाने एमिरेट्स क्रिकेट बोर्डा ( ECB) तर्फे सुरू करण्यात येणाऱ्या UAE T20 Leagueमधील एक संघ खरेदी केला आहे.

4 / 6

UAE T20 Leagueमध्ये आधीच मोठमोठी नावं जोडली गेली आहेत. मुकेश अंबानींच्या रिलायन्स, बॉलिवूड सुपर स्टार शाहरुख खान, GMRचे किरण कुमार ग्रंथी आणि EPL मधील मँचेस्टर युनायटेड क्लबचे मालक ग्लेझर कुटुंब यांनीही UAE T20 Leagueमधील संघ खरेदी केले आहेत.

5 / 6

सहा संघांचा समावेश असलेल्या लीगमध्ये दुबईतील कॅप्री ग्लोबल कंपनीचे मालक राजेश शर्मा यांचाही संघ असणार आहे. Cricbuzz च्या माहितीनुसार गौतम अदानीचा ग्रुप लवकरच ही लीग जॉईन करणार आहेत. पुढील आठवड्यात आयोजक आणि अदानी ग्रुप यांच्यातल्या करारांवर स्वाक्षरी होईल आणि तेव्हाच अधिकृत घोषणाही केली जाईल.

6 / 6

UAE T20 League ही जानेवारी-फेब्रुवारीत खेळवण्याचा विचार सुरू आहे. कोरोना व्हायरसमुळे ही लीग पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे यंदा ही लीग जून-जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे, परंतु खेळाडूंच्या उपलब्धतेबाबात साशंकता आहे.

टॅग्स :अदानीमुकेश अंबानीशाहरुख खानआयपीएल २०२२टी-20 क्रिकेट
Open in App