Join us  

निवड न झाल्यानं निराश झाले हे ४ खेळाडू; एक म्हणाला, “देव सर्वकाही पाहतोय…”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 9:39 AM

Open in App
1 / 6

चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने सोमवारी, ३१ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाची अखेरची निवड केली. त्यांनी एकाच वेळी चार मालिकांसाठी चार वेगवेगळ्या संघांची घोषणा केली आहे. या संघांमध्ये सुमारे दोन डझन खेळाडूंना संधी मिळाली आहे.

2 / 6

मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही निवड न झाल्याने काही खेळाडू निराश झाले आहेत. यानंतर त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली. यामध्ये पृथ्वी शॉ, नितीश राणा, रवी बिश्नोई आणि उमेश यादव यांच्या नावांचा समावेश आहे.

3 / 6

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची निवड केली आहे. याशिवाय बांगलादेश दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठीही संघ जाहीर करण्यात आला आहे. या चार मालिकांमध्ये भारतासाठी तीन वेगवेगळे कर्णधार खेळणार आहेत.

4 / 6

दुसरीकडे, पृथ्वी शॉची कोणत्याही संघात निवड झालेली नाही. यानंतर तो नाराज असल्याचे दिसून आले आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साईबाबांचा फोटो शेअर केला आहे. साई बाबा तुम्ही सर्वकाही पाहत असाल अशी आशा करतो असं कॅप्शन त्याने याखाली लिहिले आहे.

5 / 6

त्याचवेळी भारतीय संघाचा गोलंदाज उमेश यादवने टी-20 संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. यानंतर त्यानेही आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'तुम्ही मला मूर्ख बनवत असाल, परंतु हे लक्षात ठेवा की देव तुम्हाला पाहत आहे.' उमेश यादवला टी 20 मध्ये स्थान देण्यात आलेलं नसलं तरी तो कसोटी संघाचा भाग आहे.

6 / 6

होप म्हणजे होल्ड ऑन, पेन एन्ड्स असं नितीश राणाने आपली नाराजी व्यक्त करत लिहिलं. तर दुसरीकडे गेल्या अनेक महिन्यांपासून टीमसोबत असलेल्या रवि बिश्णोईलाही संघात स्थान देण्यात आलेले नाही. पुनरागमन हे कायमच अपयशापेक्षा मजबूत असतं, असं त्यानं म्हटलं. न्यूझीलंडमध्ये फिरकीपटूंना तितकी मदत मिळत नाही, म्हणून त्याची संघात कदाचित निवड झाली नसावी.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघपृथ्वी शॉ
Open in App