Join us  

टीम इंडियातील या पाच महिला क्रिकेटपटू आहेत खूप सुंदर, त्यांच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 7:48 PM

Open in App
1 / 6

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून निसटता पराभव पत्करावा लागला. या भारतीय महिला क्रिकेट संघातील काही क्रिकेटपटूंबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या खूप सुंदर आहेत. त्यांच्या सौंदर्यासमोर बॉलिवूडमधील अभिनेत्रीही फिक्या पडतील.

2 / 6

स्मृती मंधाना ही तिच्या लूकसाठी नेहमी चर्चेत असते. ती तिच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखली जाते. स्मृती ही नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. तसेच फॅन्सही तिचे फोटो खूप पसंत करत असतात.

3 / 6

हरलीन देओलचं नाव हे भारताच्या स्टार महिला खेळाडूंमध्ये घेतलं जातं. तिच्या फलंदाजीचं नेहमी कौतुक केलं जातं. तिचा ड्रेसिंग सेन्ससुद्धा खूप जबरदस्त आहे. सौंदर्याच्या बाबतील हरलीन कुठल्याही मॉडेलपेक्षा कमी नाही आहे.

4 / 6

राधा यादव ही मुळची उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यातील अजोशी गावातील आहे. तीसुद्धा दिसायला खूप सुंदर आहे.

5 / 6

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीसुद्धा दिसायला कुठल्याही मॉडेलपेक्षा कमी नाही आहे. हरमनप्रीत दिसायला खूप सुंदर आणि स्टायलिश आहे

6 / 6

भारतीय संघातील खेळाडू तानिया भाटिया ही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह राहते. तिने शेअर केलेले फोटो फॅन्सना खूप आवडतात. तानिया तिच्या स्फोटक फलंदाजीसाठी खूप प्रसिद्ध आहे.

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघस्मृती मानधनासेलिब्रिटी
Open in App