Join us  

१ ऑक्टोबरपासून बदलणार क्रिकेटमधील हे नियम, होणार मोठं परिवर्तन, ICCने घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 1:23 PM

Open in App
1 / 7

आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही फेरबदल करून नवे नियम लागू केले आहेत. हे नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.

2 / 7

सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखाली पुरुष क्रिकेट समितीने मेरिलबोन क्रिकेट क्लबने तयार केलेल्या नियमांबाबत महिला क्रिकेट समितीसोबत चर्चा करून काही बदल केले आणि हे नियम नव्याने लागू केले आहेत.

3 / 7

जेव्हा कुठलाही फलंदाज झेलबाद झाल्यानंतर आता नवा फलंदाज हा स्ट्राइकवरच खेळण्यासाठी येणार आहे. बाद झालेल्या फलंदाजाने क्रीज बदललं तरी त्याचा त्यावर काहीही परिणाम होणार नाही. आधीच्या नियमानुसार एखादा फलंदाज बाद झाल्यास आधी स्ट्राइक बदलायचा, तेव्हा नवा फलंदाज नॉन स्ट्राईकवर खेळण्यासाठी येत असे.

4 / 7

कोरोनामुळे २०२० च्या सुरुवातीपासून क्रिकेटवर परिणाम होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर लॉकडाऊनमुळे जगभरातील क्रिकेट बंद झाले होते. जेव्हा क्रिकेट पुन्हा सुरू झाले तेव्हा काही नियम बनवण्यात आले. त्यामध्ये चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली. आता हा नियम कायमस्वरूपी करण्यात आला आहे. म्हणजेच क्रिकेटमध्ये लाळेचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी असेल.

5 / 7

कुठलाही फलंदाज बाद झाल्यानंतर जेव्हा नवा फलंदाज स्ट्राइकवर येतो, तेव्हा त्याला पॅव्हेलियनमधून स्ट्राइकवर येण्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये २ मिनिटांच्या आता आणि टी-२० इंटरनॅशनलमध्ये ही वेळ ९० सेकंद एवढी निर्धारित करण्यात आली आहे. जर फलंदाजाने स्टाइकवर येण्याच यापेक्षा उशीर केल्यास प्रतिस्पर्धी कर्णधार टाइम आऊटचं अपील करू शकतो.

6 / 7

खेळताना फलंदाज आणि बॅट ही पिचच्या आतमध्येच असली पाहिजे. जर फलंदाजाने पिचच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला तर पंच त्या चेंडूला डेड बॉल घोषित करू शकतात. जर कुठल्याही चेंडूने फलंदाजाला पिचच्या बाहेर येण्यास भाग पाडले तर पंच हा चेंडू नोबॉल ठरवू शकतात.

7 / 7

जर एखाद्या गोलंदाजाने गोलंदाजीदरम्यान, काही गैरवर्तन किंवा जाणूनबुजून काही चुकीची हावभाव केले, तर पंच त्याच्यावर कारवाई करू शकतात. तसेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर दंडात्मक कारवाई करून फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात पाच धावा जमा करू शकतात. तसेच पंच या चेंडूला डेड बॉल घोषित करू शकतात.

टॅग्स :आयसीसीआंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App