Cricket Buzz»फोटो गॅलरी »हे काही तरी भलतंच! निवृत्तीनंतरही खेळत राहिले 'हे' क्रिकेटपटूहे काही तरी भलतंच! निवृत्तीनंतरही खेळत राहिले 'हे' क्रिकेटपटू By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 6:53 PMOpen in App1 / 5ख्रिस गेल : विश्वचषकादरम्यान वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलने निवृत्तीचे संकेत दिले होते. भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर गेल निवृत्त होणार होता. या माविकेतील तिसऱ्या सामन्यात बाद झाल्यावर भारतीय खेळाडूंनी त्याची गळाभेट घेतली. गेलनेही बॅटवर हेल्मेट ठेवत चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले. गेल नावाचे वादळ आता थंडावले, असे म्हटले गेले. पण आपण निवृत्ती घेतली नसल्याचेच गेलने जाहीर केले आणि एकच खळबळ उडाली.2 / 5शाहिद आफ्रिदी : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने 2010 साली पहिल्यांदा निवृत्ती पत्करली होती. त्यानंतर तो संघात परतला. 2011 च्या विश्वचषकात पाकिस्तानला भारताकडून उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर आफ्रिदीने पुन्हा एकदा निवृत्ती पत्करली होती. पण काही दिवसांनी तो संघात पुन्हा आला. त्यानंतर 2016 साली अखेर तो निवृत्त झाला.3 / 5जवागल श्रीनाथ : भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने 2002 साली निवृत्ती घेतली होती. पण 2003 साली झालेल्या विश्वचषकासाठी कर्णधार सौरव गांगुलीने श्रीनाथला संघात बोलावून घेतले होते.4 / 5जावेद मियाँदाद : पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावंद मियाँदाद यांनी 1996 च्या विश्वचषकापूर्वी निवृत्ती जाहीर केली होती. पण त्यावेळच्या पाकिस्तनच्या पंतप्रधान बेनझिर भुत्तो यांच्या सांगण्यावरून दहा दिवसांमध्येच मियाँदाद हे संघात परतले.5 / 5कार्ल हुपर : वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कार्ल हुपरने 1999 साली झालेल्या विश्वचषकानंतर निवृत्ती घेतली होती. पण हुपर 2001 साली संघात परतला आणि त्यानंतर 2003 साली त्याने संघाचे कर्णधारपदही भूषवले. आणखी वाचा Subscribe to Notifications