Cricket Buzz»फोटो गॅलरी »भारताचा 'हा' हॉकीपटू Yo-Yo चाचणीत विराट कोहलीवर भारी!भारताचा 'हा' हॉकीपटू Yo-Yo चाचणीत विराट कोहलीवर भारी! By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 3:16 PMOpen in App1 / 10२०१७च्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापन यांनी खेळाडूंच्या तंदुरुस्तीवला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.2 / 10त्यानंतर टीम इंडियात निवड होण्यासाठी खेळाडूंना Yo-Yo चाचणी पास करणे अनिवार्य केले. जो खेळाडू ही चाचणी पास करेल, त्याला संघात स्थान मिळेल.3 / 10कर्णधार विराट कोहली हा भारताचा सर्वात तंदुरुस्त खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच युवा पिढीला विराटच्या फिटनेसचे आकर्षण आहे.4 / 10पण, विराटवरही Yo-Yo चाचणीत तीन खेळाडू भारी पडले आहेत. त्यापैकी एक खेळाडू हा टीम इंडियाचा हॉकीपटू आहे आणि त्याच्या तंदुरुस्तीशी विराटची तुलना होणे नाही.5 / 10मनीष पांडे Yo-Yo चाचणी विराटला टक्कर देतो. मैदानावरील त्याचे चापल्य हे विराटलाही मागे टाकणारे आहे आणि त्याची प्रचिती त्यानं अनेकदा दिली आहे.6 / 10पीटीआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार कोहलीनं Yo-Yo चाचणीत १९ गुणांची कमाई केली होती. पण, मनीष पांडेचे गुण हे १९.२ इतके होते. युवराज सिंगला तेव्हा Yo-Yo चाचणी पास करता आली नव्हती.7 / 10मयांक डागर हे नाव अनेकांनी ऐकलेही नसेल. पण, त्यानेही २०१८च्या Yo-Yo चाचणीत १९.३ गुणांची कमाई करताना विराटसह मनीषलाही मागे टाकले होते. 8 / 10हिमाचल प्रदेशचा हा खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगमधील किंग्स इलेव्हन पंजाबचा सदस्य आहे. 9 / 10करुण नायरचे Yo-Yo चाचणीतील गुण माहीत नसले तरी भारतीय संघाचे माजी ट्रेनर शंकर बासू यांच्यामते तो संघातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू आहे. 10 / 10भारताच्या हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग हा या सर्वांवर भारी ठरतो. त्यानं Yo-Yo चाचणीत २१.४ गुणांची कमाई केली आहे आणि त्यानं स्वतःचा २१.३ गुणांचा विक्रम मोडलाय. आणखी वाचा Subscribe to Notifications