तिलक वर्मानं मोडला कोहलीचा विक्रम! इथं पाहा T-20I मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय बॅटर

एक नजर द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या रेकॉर्ड्सवर

भारतीय संघातील युवा फलंदाज तिलक वर्मा याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मिळालेल्या बढतीचा पुरेपूर फायदा उठवत आपल्यातील क्षमता दाखवून दिलीये.

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी-२० मालिकेत बॅक टू बॅक शतक करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला.

४ टी-२० सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करत त्याने दक्षिण आफ्रिका दौरा गाजवलाय.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील मालिकेत त्याने २ शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने २८० धावा केल्या. या कामगिरीसह त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडित काढला. द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता त्याच्या नावे झाला आहे.

भारतीय संघाकडून द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२१ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत त्याने २३१ धावा केल्या होत्या. २०२४ च्या हंगामातील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कोहलीनं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये.

टी-२० मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत लोकेश राहुल तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०२० मध्ये त्याने न्यूझीलंड दौऱ्यावरील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत २२४ धावा काढल्या होत्या.

ऋतुराज गायकवाड या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी २० मालिकेत त्याने २२३ धावा केल्या होत्या.

विकेटकीपर-बॅटर संजू सॅमसनचाही टॉप-५ मध्ये नंबर लागतो. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मालिकेतील दोन शतकासह त्याने २०१६ धावा आपल्या खात्यात जमा केल्या.