Join us  

Smriti Mandhana Birthday : प्रसिद्ध कॅफेची मालकीण असलेली 'नॅशनल क्रश'! RCB ला चॅम्पियन बनवणारी स्मृती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 1:16 PM

Open in App
1 / 9

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना तिच्या अप्रतिम खेळीने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. तिच्या सौंदर्यामुळे भारताची नॅशनल क्रश म्हणूनही तिला ओळख मिळाली.

2 / 9

स्मृती २८ वर्षांची झाली असून, आज गुरुवारी तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

3 / 9

महिला प्रीमिअर लीगमध्ये आरसीबीला चॅम्पियन बनवण्यात कर्णधार स्मृतीचे मोठे योगदान आहे. स्पर्धेच्या दुसऱ्याच हंगामात स्मृती मानधनाने आरसीबीला ट्रॉफी जिंकवून दिली.

4 / 9

स्मृतीला क्रिकेटशिवाय रेस्टॉरंट सांभाळणे तसेच खाद्य पदार्थ बनवण्याची आवड आहे. तिच्या याच आवडीमुळे तिच्या मालकिची एक कॅफे आहे.

5 / 9

स्मृती मानधनाच्या या कॅफेचे नाव SM 18 स्पोर्ट्स कॅफे असे आहे. अलीकडेच या कॅफेचा पाचवा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. हा प्रसिद्ध कॅफे सांगलीत आहे.

6 / 9

आपल्या बहिणीची आवड जोपासण्यासाठी स्मृतीचा मोठा भाऊ श्रवण मानधनाने पुढाकार घेतला. तोच या कॅफेचा कारभार सांभाळतो. स्मृती अनेकदा तिच्या कॅफेला भेट देत असते.

7 / 9

क्रिकेट अन् सौंदर्यामुळे तिला जगभर प्रसिद्धी मिळाली. ती येताच चाहते तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी एकच गर्दी करतात.

8 / 9

स्मृती मानधना आणि गायक पलाश मुच्छल रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जाते. पलाश हा इंदौरचा रहिवाशी असून तो पेशाने एक गायक आहे. गतवर्षी २०२३ मध्ये स्मृती आणि पलांश दोघांच्या रिलेशनशीपचे वृत्त माध्यमांत आले.

9 / 9

पलाशने एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाणे गाऊन ते स्मृतीला डेडिकेट केले होते, तर आय लव्ह यू टू स्मृती.. असेही त्याने म्हटले होते. महिला प्रीमिअर लीगमध्ये चॅम्पियन झाल्यानंतर दोघांमधील प्रेमाची जादू की झप्पी पाहायला मिळाली होती.

टॅग्स :स्मृती मानधनाभारतीय महिला क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघसेलिब्रिटीऑफ द फिल्ड