जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ कोणते? BCCIची कमाई जाणून उडेल झोप!

Top 10 richest cricket boards in the world भारतात क्रिकेटचं वेड केवढं आहे, हे संपूर्ण जगाला माहित्येय. जगातील क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) ही सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. पण, त्यांचे नेमकं उत्पन्न किती, हे तुम्हाला माहित्येय?

श्रीलंका क्रिकेट बोर्ड - सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेट मंडळांमध्ये श्रीलंका १०व्या क्रमांकावर आहे. २०२१मध्ये त्यांनी जवळपास १०० कोटींची कमाई केली. १९७५मध्ये श्रीलंका क्रिकेट मंडळाची स्थापना झाली.

झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड - एका रिपोर्टनुसार झिम्बाब्वेनं २०२१ मध्ये ११३ कोटींची कमाई केली आहे. १९९२मध्ये या बोर्डाची स्थापना झाली.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड - ११६ कोटींची कमाई करून विंडीज क्रिकेट बोर्ड ८व्या क्रमांकावर आहेत. १९२०मध्ये या बोर्डाची स्थापना झाली.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड - न्यूझीलंड क्रिकेटची कमाई ही २१० कोटी आहे.

क्रिकेट दक्षिण आफ्रिका - ४८५ कोटींची कमाई

बांगलादेश क्रिकेट बोर्ड - ८०२ कोटींची कमाई

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड - ८११ कोटींची कमाई

इंग्लंड क्रिकेट बोर्ड - तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंड क्रिकेट बोर्डाची कमाईचा आकडा कळलेला नाही.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया - २८४३ कोटींची कमाई

भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ - जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयची कमाई ही ३७३० कोटी इतकी आहे.