Join us  

"येणारा विश्वचषक माझा शेवटचा असेल म्हणूनच मला भारतीय संघात स्थान मिळवायचंय"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 4:20 PM

Open in App
1 / 10

भारतीय संघातून मागील मोठ्या कालावधीपासून बाहेर असलेल्या उमेश यादवने एक मोठे विधान केले आहे. या वर्षी होणाऱ्या वन डे विश्वचषकाबाबत वेगवान गोलंदाज उमेश यादवने एक विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

2 / 10

आगामी काळात वन डे विश्वचषक येणार असून त्यामुळे संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्याने म्हटले आहे. उमेश यादवच्या म्हणण्यानुसार, तो आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तो विश्वचषकासाठी आपला दावा मजबूत करू शकेल.

3 / 10

खरं तर उमेश यादवची गणना भारताच्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याने भारताच्या अनेक विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

4 / 10

उमेशने 2011 मध्ये भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले होते. मायदेशात 100 बळी घेणार्‍या मोजक्या गोलंदाजांच्या यादीत उमेश यादवचा समावेश आहे.

5 / 10

याशिवाय यादवने आपल्या कारकिर्दीत अनेक वन डे सामने देखील खेळले, मात्र मागील काही वर्षांपासून तो वन डे संघातून बाहेर आहे. आता त्याला भारताच्या वन डे संघात पुनरागमन करायचे आहे.

6 / 10

31 मार्चपासून इंडियन प्रीमिअर लीगचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी उमेश यादव प्रयत्नशील आहे.

7 / 10

इंडिया टुडेशी संवाद साधताना उमेश यादवने म्हटले, 'विश्वचषकात स्थान मिळवायचे आहे, ही गोष्ट माझ्या मनात सातत्याने येत राहते. चार वर्षांतून एकदा विश्वचषक येतो आणि मला वाटते की हा माझा शेवटचा विश्वचषक असेल.'

8 / 10

'मी आयपीएलमध्ये माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे मला आशा आहे की, मी विश्वचषक संघाचा भाग होऊ शकेन कारण तो यानंतर पुन्हा चार वर्षांनीच येईल.'

9 / 10

तसेच मला आशा आहे की, आयपीएलमध्ये देखील मला संधी मिळेल आणि आणखी चार वर्षे वाट पाहण्याऐवजी यंदाच मला भारताच्या विश्वचषक संघात स्थान मिळेल, असे उमेश यादवने अधिक सांगितले.

10 / 10

लक्षणीय बाब म्हणजे आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.

टॅग्स :आयसीसी आंतरखंडीय चषकआयपीएल २०२३भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ
Open in App