Cricket Buzz»फोटो गॅलरी »Umran Malik: काश्मीरच्या खोऱ्यातून निघाला जगातील सर्वात घातक गोलंदाज, वडील आजही चालवतात फळांचा गाडाUmran Malik: काश्मीरच्या खोऱ्यातून निघाला जगातील सर्वात घातक गोलंदाज, वडील आजही चालवतात फळांचा गाडा By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 2:12 PMOpen in App1 / 7 Umran Malik: आयपीएल 2022 (IPL 2022) च्या यंदाच्या मोसमात दररोज एकापेक्षा एक जबरदस्त सामने होत आहेत. यात भारताया युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) याच्या नावाची जोरदार चर्चा आहे.2 / 7 उमरान मलिकने आपल्या वेगाने संपूर्ण जगाला आपल्याकडे आकर्षित केले आहे. काश्मीरच्या या तरुण गोलंदाजाकडे भारताचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. येत्या काळात उमरात भारतीय संघात दिसू शकतो.3 / 7 उमरान 150Kmph पेक्षाही जास्त वेगाने गोलंदाजी करत असून, त्याचे नाव जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांमध्ये घेतले जात आहे. आयपीएल 2022 च्या 8 सामन्यात त्याने 15 विकेट घेतल्या आहेत.4 / 7 विशेष म्हणजे, उमरानला आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली नाही. सलेक्टर्सने उमरानची दक्षिण आफ्रीका दौऱ्यासाठी इंडिया-ए टीममध्ये निवड केली होती, पण दौऱ्यात त्याची निवड झाली नाही. 5 / 7 आयपीएलमध्ये मोठमोठ्या फलंदाजांना आपल्या वेगाने चकीत करणाऱ्या या गोलंदाजासमोर बुमराह आणि शमीदेखील कमी वाटतात. पण, येत्या काळात आगामी साउथ आफ्रीका सीरीजमध्ये निवड होण्याची शक्यता आहे.6 / 7 विशेष म्हणजे, उमरान मलिक अतिशय गरीब कुटुंबातून येतो. त्याचे वडील आजही फळांचा गाडा लावतात. उमरानचे वडील अब्दुल रशीद म्हणाले, उमरानची कामगिरी पाहून मार्केटमध्ये त्यांना लोक खूप आदबीने बोल आहेत. 7 / 7 अब्दुल रशीद म्हणतात की, उमरान लहानपणापासून क्रिकेक खेळायचा, त्याला आधीपासूनच वेगवान गोलंदाज व्हायचे होते. त्यांना आता उमरानला वर्ल्ड कप खेळताना पाहायचे आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications