Join us  

U19 Women World Cup: झोपडीत वाढलेल्या मुलीने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला; वडील अन् भावाच्या मृत्यूनंतरही नाही खचली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 1:55 PM

Open in App
1 / 8

आयसीसी १९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ आज, रविवारी बलाढ्य इंग्लंडविरुद्ध भिडणार आहे. यावेळी इंग्लंडला नमवून ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी भारतीय मुलींपुढे आहे.

2 / 8

इंग्लंडने महिला क्रिकेटमधील प्रत्येक विश्वचषकाच्या पहिल्या सत्रात जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे भारतीय मुलींना आपला सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. भारतीय टीममध्ये ऑलराऊंडर अर्चना देवी चर्चेत आली आहे. अर्चना देवीचा टीम इंडियापर्यंत येण्याचा मोठा प्रवास आहे.

3 / 8

उत्तर प्रदेशची रहिवासी असलेल्या सावित्री देवी यांनी आज मार्केटमधून इन्व्हर्टर खरेदी करणार आहेत, कारण त्यांना मुलगी अर्चना हिच्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहायचा आहे.हा सामना रात्री इंग्लंडमध्ये होणार आहे. अर्चना देवी हिनेही आपल्या आईला एक स्मार्ट फोन भेट दिला आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध 1-1 बळी घेणाऱ्या अर्चनाच्या वडीलांचा 2007 साली मृत्यू झाला.

4 / 8

ICC ने पहिल्यांदाच महिला अंडर-19 विश्वचषक स्पर्धा आयोजित केली आहे. दक्षिण आफ्रिकेत होत असलेली ही स्पर्धा जिंकून भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांना इतिहास रचण्याची संधी आहे. अर्चनाच्या राताई पुर्वा गावाची 400 लोकसंख्या आहे. 'आमच्या गावात विजेची शाश्वती नाही, म्हणून मी इन्व्हर्टर घेण्यासाठी पैसे जमा केले. माझी मुलगी देशासाठी वर्ल्ड कपची फायनल खेळत आहे. मी तो सामना पाहणार आहे, असं अर्चनाच्या आई सावित्री देवी म्हणाल्या.

5 / 8

क्रिकेटर अर्चना देवीची परिस्थिती गरीब आहे. अगदी लहान वयात वडिलांना गमावल्यानंतर तिच्या धाकट्या भावाचा सहा वर्षांपूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाला. याच वर्षी अर्चना पहिल्यांदा मैदानात उतरली होती. पुरुष संघाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवचे प्रशिक्षक पूनम गुप्ता आणि कपिल पांडे यांनी तिला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

6 / 8

'मी माझ्या 1 एकर शेतात काम केले आणि उदरनिर्वाहासाठी माझ्या दोन गायी पाळल्या. मी अर्चनाला घरापासून दूर गंज मुरादाबाद येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वसतिगृहात राहायला पाठवले होते म्हणून लोक मला टोमणे मारायचे. तिथे रुजू होण्यापूर्वी रोजचे 30 रुपये बसचे भाडेही देणे माझ्यासाठी कठीण होते.

7 / 8

सावित्री देवी या मोठ्या मुलासोबत एका खोलीच्या गच्चीत घरात राहते. विश्वचषकासाठी रवाना होण्यापूर्वी मुलीने भेट दिलेला स्मार्टफोनवर अर्चनाचा अंतिम सामना ऑनलाइन पाहणार आहे,अर्चनाची आई सावित्री देवी म्हणाल्या.

8 / 8

महिला आयपीएल देखील यावर्षी होणार आहे, ज्याचे प्रसारण हक्क 951 कोटी रुपयांना विकले आहेत. कॉर्पोरेट हाऊसेसने 4,699 कोटी रुपयांना पाच फ्रँचायझी विकत घेतल्या. आता जर भारतीय महिलांनी आज अंडर-19 विश्वचषक जिंकला तर त्यांना मोठ्या प्रमाणात बक्षीस असणार आहेत. या विश्वचषकात भारताने 6 पैकी 5 सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव झाला, तर ऑस्ट्रेलियाला पराभूत करून इंग्लंड येथे आले आहे.

टॅग्स :ऑफ द फिल्ड
Open in App