विजय शंकरच्या टीम इंडियातील 'हार्दिक' स्वागतामागची भारी गोष्ट

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विजय शंकरने अखेरीस भारताच्या वन डे संघात स्थान पटकालवे. त्याला 2016च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विजयचा कसोटी व वन डे संघात समावेश करण्यात आला होता, परंतु दुखापतीने त्याच्याकडून ती संधी हिरावून घेतली. त्यावेळी विजयच्या जागी बदली खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याला संधी मिळाली आणि पांड्या त्यानंतर संघाचा कायमचा सदस्य झाला. नियतीचा खेळ म्हणा त्याच पांड्याला बदली खेळाडू म्हणून विजयला भारतीय संघात स्थान मिळाले. कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील वादग्रस्त विधानामुळे पांड्याला निलंबित करण्यात आले आणि त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलावण्यात आले. त्याला बदली खेळाडू म्हणून विजयला संघात स्थान मिळाले. अदलाबदलीचे हे वर्तुळ ऑस्ट्रेलियात सूरु होऊन येथेच पूर्ण झाले.

विजय शंकरचा जन्म 26 जानेवारी 1991 चा. विजय उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.

कारकिर्दीच्या सुरुवातीला विजय ऑफ स्पिनर होता, परंतु त्याने मध्यमगती गोलंदाज होण्याचे ठरवले आणि त्याला तामिळनाडू संघात स्थान पटकावले.

वडील एच शंकर हेही त्यांच्या तरुणपणी क्रिकेट खेळायचे. मोठा भाऊ अजय हाही तामिळनाडूच्या विभागीय स्पर्धेत खेळतो

प्रवासामुळे येणारा आळसपणा टाळण्यासाठी विजय घरच्या टेरेसवर क्रिकेटचा सराव करायचा. त्याने गच्चीचे नेट्समध्ये रुपांतर केले होते.

स्थानिक स्पर्धांत त्याने जवळपास 50 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 41 सामन्यांत 2099 धावा त्याच्या नावावर आहेत.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतो. 2014 मध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जकडून एक सामना खेळला होता.

राहुल द्रविड हा त्याचा आदर्श आहे. द्रविडची ॲडलेडवरील 233 आणि नाबाद 72 धावांची विजयी खेळीचा त्याच्यावर प्रचंड प्रभाव आहे. विजयला त्या खेळीतून आजही प्रेरणा मिळते.

विजयच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू संघाने विजय हजारे आणि देवधर ट्रॉफी जिंकली होती.