मुंबईत शुक्रवारी रंगलेल्या Indian Sports Honours सोहळ्यात हवा राहिली ती विराट कोहली अन् अनुष्का शर्मा या जोडीची...
या दोघांचा हॉट लूक पाहून चाहते घायाळ झाले. या सोहळ्यात विराट आणि अनुष्का यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.
हा सोहळा फेब्रुवारी महिन्यात होणार होता, परंतु पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे तो पुढे ढकलण्यात आला.
या सोहळ्यात 11 विविध क्रीडा स्पर्धांतील भारतीय खेळाडूंना गौरविण्यात आले. पुल्लेला गोपीचंद, अभिनव बिंद्रा, सरदार सिंग, महेश भुपती, पी टी उषा आणि अंजली भागवत या दिग्गज खेळाडूंच्या समितीनं या खेळाडूंची निवड केली.