Join us  

Virat Kohli 100th Test, IND vs SL 1st Test: शतकवीर विराट! किंग विराट कोहलीने क्रिकेटमध्ये बनवलेत १० खास रेकॉर्ड, पाहा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 10:26 AM

Open in App
1 / 11

भारताचा आघाडीचा फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली आज आपल्या कसोटी कारकिर्दीमधील १०० वा सामना खेळत आहे. १०० कसोटी खेळणाऱ्या विराटने या काळात अनेक खास रेकॉर्ड बनवले आहेत. आजच्या ऐतिहासिक दिनी विराटच्या त्या खास रेकॉर्डचा घेतलेला आढावा.

2 / 11

विराट कोहली हा जागतिक क्रिकेटमधील असा पहिला क्रिकेटपटू आहे ज्याची क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये म्हणजेच कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मध्ये ५० हून अधिक धावांची सरासरी आहे.

3 / 11

विराट कोहली हा भारताचा एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने कसोटी क्रिकेटमद्ये सर्वाधित ७ द्विशतके फटकावलेली आहेत. आपण दीर्घकाळ फलंदाजी करू शकतो हे त्याने त्यातून दाखवून दिले होते. मात्र कसोटी आणि वनडेत शतकांचा पाऊस पाजणाऱ्या विराटला टी-२०मध्ये मात्र शतक फटकावता आलेले नाही.

4 / 11

विराट कोहली कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके फटकावणारा जगातील दुसरा फलंदाज आहे. त्याने कर्णधार म्हणून २० शतके फटकावली आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके फटकावणाऱ्यांच्या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅहम स्मिथ हा अव्वलस्थानी आहे. त्याने कर्णधार म्हणून २५ शतके फटकावली आहेत.

5 / 11

सध्या भारताकडून जेवढे खेळाडू कसोटी क्रिकेट खेळत आहेत, त्यामधील कुणीही २७ शतके फटकावलेली नाहीत. सध्या खेळत असलेल्या जगातील क्रिकेटपटूंपैकी केवळ स्टिव्ह स्मिथ त्याच्या बरोबरीत आहे.

6 / 11

विराट कोहली असा दुसरा क्रिकेटपटू आहे ज्याने कर्णधार म्हणून पदार्पण केलेल्या कसोटीच्या दोन्ही डावांत शतक फटकावले आहे. या रेकॉर्डच्या माध्यमातून त्याने ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. विराट कोहलीने २०१४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अॅडलेड कसोटीत ही कामगिरी केली होती.

7 / 11

विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. याबाबतीत त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. विराट कोहलीने ६८ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यातील ४० सामन्यांत भारताने विजय मिळवलेला आहे.

8 / 11

एका कॅलेंडर वर्षात दोन वेळा सर्वाधिक धावा बनवणारा विराट कोहली भारताचा पहिला क्रिकेटपटू आहे. २०१७ मध्ये विराट कोहलीने तिन्ही प्रकारात २८१८ धावा फटकावल्या होत्या. त्यआधीच्या वर्षात त्याने २५९५ धावा काढल्या होत्या.

9 / 11

विराट कोहली हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात नंबर १ फलंदाज बनलेला एकमेव क्रिकेटपटू आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये विराट पहिल्यांदा एकदिवसीय क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचला होता. त्यानंतर दोन वर्षांनी तो टी-२० मध्ये अव्वलस्थानी पोहोचला. तर २०१८ मध्ये विराटने कसोटी फलंदाजीतील स्टिव्ह स्मिथची मक्तेदारी मोडीत काढून विराटने कसोटीतही अव्वलस्थान पटकावले.

10 / 11

विराट कोहली हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात नंबर १ फलंदाज बनलेला एकमेव क्रिकेटपटू आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये विराट पहिल्यांदा एकदिवसीय क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचला होता. त्यानंतर दोन वर्षांनी तो टी-२० मध्ये अव्वलस्थानी पोहोचला. तर २०१८ मध्ये विराटने कसोटी फलंदाजीतील स्टिव्ह स्मिथची मक्तेदारी मोडीत काढून विराटने कसोटीतही अव्वलस्थान पटकावले.

11 / 11

विराट कोहली हा क्रिकेट जगतातील असा एकमेव फलंदाज आहे ज्याने सलग ३ शतके फटकावली आहेत. त्याने हा विक्रम वेस्ट इंडिड आणि श्रीलंकेविरुद्ध केला होता.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघआंतरराष्ट्रीय
Open in App