Join us  

pooja bishnoi: क्रिकेटवेड्या मामाने भाचीला बनवले चॅम्पियन; 'किंग कोहली' धावला मदतीला, धोनीही झाला फॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 11:21 AM

Open in App
1 / 8

22 वर्षीय सरवन बुडिया या तरूणाला क्रिकेटर बनायचे होते. राष्ट्रीय स्तरावरील काही स्पर्धांमध्ये त्याने नाव देखील कमावले आहे. पण एक वेळ अशी आली की तो हॅमस्ट्रिंगचा बळी ठरला. त्यामुळे तो शर्यतीत मागे पडला आणि त्याचे स्वप्न स्वप्नच राहिले.

2 / 8

जरी सरवन स्वत:चे हे स्वप्न साकार करू शकला नाही तरी त्याने आपली भाची पूजा बिश्नोईला यशाच्या शिखरावर नेण्याचा निर्धार केला आहे. पूजा केवळ तीन वर्षांची असताना सरवनने तिला धावपटू बनवण्याची तयारी सुरू केली.

3 / 8

आपल्या मामाप्रमाने पूजा बिश्नोईला देखील खेळाचे वेड होते. ती तिच्या गावात धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायची. त्यानंतर ज्यांचे वय तिच्यापेक्षा जास्त होते अशा मुलांनाही ती मागे टाकू लागली.

4 / 8

पूजा ही शेतकरी कुटुंबातील सदस्य आहे. सरवन बुडियाने आपले प्रशिक्षण सुरू ठेवले, त्यासाठी त्याला समाज आणि कुटुंबाचे टोमणे ऐकावे लागले. पण मामाने हार मानली नाही आणि आपल्या भाचीला स्टार ॲथलीट बनवण्याचे स्वप्न पूर्ण केले.

5 / 8

पूजा फक्त 11 वर्षांची आहे आणि क्रिकेटचे दिग्गज विराट कोहली आणि एमएस धोनी तिचे चाहते बनले आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनीने पूजाची भेट घेतली. तर तिचा खर्च विराट कोहली उचलत आहे.

6 / 8

विराट कोहलीने पूजाला राहण्यासाठी जोधपूरमध्ये फ्लॅटही दिला आहे. पूजाचे मामा सरवन बुडिया आता तिच्या भावालाही प्रशिक्षण देत आहेत. सरवनची आता दोन मोठी स्वप्ने आहेत. पहिले म्हणजे त्याच्या भाचीने उसेन बोल्टचा विक्रम मोडावा आणि दुसरे म्हणजे गरीब खेळाडूंना प्रशिक्षण देणारी क्रीडा अकादमी उघडावी.

7 / 8

सरवन पूजा आणि तिच्या भावावर खूप मेहनत घेत आहे. त्यानुसार एक दिवस पूजा उसेन बोल्टचा विक्रम मोडेल अशी अपेक्षा आहे.

8 / 8

पूजा बिश्नोई स्टार ॲथलीट बनल्यानंतर तिचा मामा सरवनला मोठा खेळाडू न झाल्याबद्दल क्वचितच खेद वाटेल. मात्र, तो आता गरीब मुलांवर लक्ष केंद्रित करून त्यांना यशस्वी खेळाडू बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

टॅग्स :विराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघप्रेरणादायक गोष्टी
Open in App